Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 18

65 Mantra
23/18
Devata- प्राणादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराड्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
प्रा॒णाय॒ स्वाहा॑पा॒नाय॒ स्वाहा॑ व्या॒नाय॒ स्वाहा॑। अम्बे॒ऽअम्बि॒केऽम्बा॑लिके॒ न मा॑ नयति॒ कश्च॒न। सस॑स्त्यश्व॒कः सुभ॑द्रिकां काम्पीलवा॒सिनी॑म्॥१८॥

प्रा॒णाय॑। स्वाहा॑। अ॒पा॒नाय॑। स्वाहा॑। व्या॒नायेति॑ विऽआ॒नाय॑। स्वाहा॑। अम्बे॑। अम्बि॑के। अम्बा॑लिके। न। मा॒। न॒य॒ति॒। कः। च॒न। सस॑स्ति। अ॒श्व॒कः। सुभ॑द्रिका॒मिति॒ सुऽभ॑द्रिकाम्। का॒म्पी॒ल॒वा॒सिनी॒मिति॑ काम्पीलऽ वा॒सिनी॑म् ॥१८ ॥

Mantra without Swara
प्राणाय स्वाहाऽअपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा अम्बे अम्बिके म्बालिके न मा नयति कश्चन । ससस्त्यश्वकः सुभद्रिकाङ्काम्पीलवासिनीम् ॥

प्राणाय। स्वाहा। अपानाय। स्वाहा। व्यानायेति विऽआनाय। स्वाहा। अम्बे। अम्बिके। अम्बालिके। न। मा। नयति। कः। चन। ससस्ति। अश्वकः। सुभद्रिकामिति सुऽभद्रिकाम्। काम्पीलवासिनीमिति काम्पीलऽ वासिनीम्॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अम्बे) माते, हे (अम्बिके) आज्जी आणि हे (अम्बिलिके) पणजी, (कश्‍चन) कोणी (एक असा असतो की जो) (अश्‍वकः) घोड्याप्रमाणे शीघ्रगामी (चपळ, उद्योगी) माणूस देखील (काम्पीलवासिनीम्) सुखकामी आणि व मनुष्याला आळशी बनविणार्‍या (सुभद्रिकाम्) उत्तम कल्याण करणार्‍या लक्ष्मी (धनसंपदा) प्राप्त करून (ससस्ति) झोपतो (भरपूर धनसंपत्ती जमल्यामुळे आळशी व निरूद्योगी बनतो) पण अशी ती संपत्ती (मा) उधमी उत्साही व्यक्तीला म्हणजे मला (न) (नयति) आपल्या वशात आणू शकत नाही. यामुळे मी (प्राणाय) प्राणांच्या पोषणासाठी (स्वाहा) सत्यवाणीचा (स्वीकार करतो) (अपानाय) दुःखे दूर करण्यासाठी (स्वाहा) सुसंस्कृत वाणीचा उपयोग करतो आणि (व्यानाय) सर्व शरीरात व्याप्त होणार्‍या आपल्या आत्म्यासाठी (स्वाहा) सत्यवाणीचा उपयोग करतो. ॥18॥
Essence
भावार्थ- हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे माता, आजी व पणजी आपल्या मुला-मुलीनां, नाती-पणतूंना चांगले संस्कार देतात, त्याप्रमाणे तुम्हीदेखील आपल्या संततीला सुशिक्षित सुसंस्कारित केले पाहिजे. धनाचे वैशिष्ट्य आहेकी ते ज्या ठिकाणी साचते, त्या लोकांना निद्रालू, आळशी, ऐदी आणि निरूद्योगी करते. त्यामुळे धन प्राप्त झाल्यान्रंही माणसाने पुरूषार्थ व परिश्रम करणे सोडूं नये.॥18॥
Subject
मनुष्यांनी काय काय जाणावे, याविषयी. -