Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 16

65 Mantra
23/16
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडजगती Swara- निषादः
Mantra with Swara
न वाऽउ॑ऽए॒तन्म्रि॑यसे॒ न रि॑ष्यसि दे॒वाँ२ऽइदे॑षि प॒थिभिः॑ सु॒गेभिः॑। यत्रास॑ते सु॒कृतो॒ यत्र॒ ते य॒युस्तत्र॑ त्वा दे॒वः स॑वि॒ता द॑धातु॥१६॥

न। वै। ऊँ॒ऽइत्यूँ॑। ए॒तत्। म्रि॒यसे॒। न। रि॒ष्य॒सि॒। दे॒वान्। इत्। ए॒षि॒। प॒थिभि॒रिति॒ प॒थिऽभिः॑। सु॒गेभि॒रिति॑ सु॒ऽगेभिः॑। यत्र॑। आस॑ते। सु॒कृत॒ इति॑ सु॒ऽकृतः॑। यत्र॑। ते। य॒युः। तत्र॑। त्वा॒। दे॒वः। स॒वि॒ता। द॒धा॒तु॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
न वाऽउऽएतन्म्रियसे न रिष्यसि देवाँऽइदेषि पथिभिः सुगेभिः । यत्रासते सुकृतो यत्र ते ययुस्तत्र त्वा देवः सविता दधातु ॥

न। वै। ऊँऽइत्यूँ। एतत्। म्रियसे। न। रिष्यसि। देवान्। इत्। एषि। पथिभिरिति पथिऽभिः। सुगेभिरिति सुऽगेभिः। यत्र। आसते। सुकृत इति सुऽकृतः। यत्र। ते। ययुः। तत्र। त्वा। देवः। सविता। दधातु॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यार्थी, (यत्र) जेथे (ते) तुझे (सुकृतः) धर्मात्मा योगी विद्वान (आसते) बसतात वा राहतात आणि मोठ्या आनंद (ययुः) प्राप्त करतात (त्या आश्रमात व प्रदेशात तू जाऊन राहा) तसेच (यत्र) जेथे (सुगेभिः) सुखाने जाता येते वा प्रवास करता येते अशा (पथिभिः) मार्गावर जात-जात तू (देवान्) दिव्य गूण अथवा दिव्य विद्वानांना (एषि) प्राप्त करू शकशील (त्या मार्गावर तू जा) जेथे (सतत्) वरील वर्णित सर्व म्हणजे योगी विद्वान (उ) निश्‍चयाने आहेत तेथे तू स्थिरपणे राहा. तिथे (न) (म्रियसे) तू नष्ट होणार नाहींत (न, वै)(रिष्यसि) तसेच तू दुसर्‍याचाही नाश वा हानी करणार नाहीस. (तत्र) तिथे दिव्य स्थानी (इत्) निश्‍चयाने (त्वा) तुला (सविता) समस्त जगाचा उत्पादक परमेश्‍वरा (देवः) जो स्वतः प्रकाशमान दिव्यत्ववान आहे. तो ही तुला (दधातु) धारण करील (परमेश्‍वराची कृपा तिथे तुला लाभेल.) ॥16॥
Essence
भावार्थ - जर मनुष्याने स्वरूपाला ओळखले तर त्याला आपल्या (जीवात्मारूपाने) अविनाशित्व कळेल. जे लोक धर्मयुक्त मार्गाने जातात, ते सत्कर्म करण्यार्‍या लोकांप्रमाणे आनंद प्राप्त करतात आणि जर मनुष्यांची परमेश्‍वराची सेवा केली, तर परमेश्‍वर जीवांना सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा देतो ॥16॥
Subject
मनुष्यांनी कसे असावे, याविषयी.-