Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 14

65 Mantra
23/14
Devata- ब्रह्मादेवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सꣳशि॑तो र॒श्मिना॒ रथः॒ सꣳशि॑तो र॒श्मिना॒ हयः॑। सꣳशि॑तो अ॒प्स्वप्सु॒जा ब्र॒ह्मा सोम॑पुरोगवः॥१४॥

सशि॑त॒ इति॒ सम्ऽशि॑तः। र॒श्मिना॑। रथः॑। सशि॑त॒ इति॒ सम्ऽशि॑तः। र॒श्मिना॑। हयः॑। सशि॑त॒ इति॒ सम्ऽशि॑तः। अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। अ॒प्सु॒जा इत्य॑प्सु॒ऽजा। ब्र॒ह्मा। सोम॑ऽपुरोगवः ॥१४ ॥

Mantra without Swara
सँशितो रश्मिना रथः सँशितो रश्मिना हयः । सँशितो अप्स्वप्सुजा ब्रह्मा सोमपुरोगवः ॥

सशित इति सम्ऽशितः। रश्मिना। रथः। सशित इति सम्ऽशितः। रश्मिना। हयः। सशित इति सम्ऽशितः। अप्स्वित्यप्ऽसु। अप्सुजा इत्यप्सुऽजा। ब्रह्मा। सोमऽपुरोगवः॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्या मनुष्यांनी (कारीगरांनी वा यांत्रिक जनांनी) (रश्मिना) सूर्यकिरणांच्या साहाय्याने चालणारे आणि (रथः) आनंद व सोय देणारे यात (सँशितः) उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यान केले आहे, (ते प्रशंसित अवश्य होतात) तसेच (रश्मिना) लगामाद्वारे प्रशिक्षित वा नियंत्रित (हयः) घोडा, आणि (सँशितः) चालण्यात वा गतीत जे तीव्र म्हणजे उत्तम आहे, (त्याला प्रशिक्षण देणारे प्रशंसनीय होतात) तसेच (अप्सु) प्राणांत (अप्सुजाः) प्राणवायू रूपाने संचार करणारे पवन अथवा पाण्यातून निर्माण केलेली वाफ तसेच (सोमपुरोगवः) औषधीचे ज्ञान करून देणारा आणि ऐश्‍वर्य समृद्धी मिळवूद देणारा जो सर्वप्रथम असा ब्रह्मा महाविद्वान आहे, तो (सँशितः) सर्वांतर्फे अतिप्रशंसित का होऊ नये? (अर्थात यांत्रिकजन, अश्‍वप्रशिक्षक, विद्वान हे सर्व समाजात अवश्य सत्कार-आदरास प्राप्त होतात) त्यामुळे सर्व लोकांना सुख-आनंद मिळतो, हे साहजिकच आहे. ॥14॥
Essence
भावार्थ- जे लोक पदार्थांचे विशेष ज्ञान प्राप्त करून विद्वान होतात, त्यांनी इतरांनाही विद्यावान करावे म्हणजे ते समाजात प्रशंसनीय होतात. ॥14॥
Subject
विद्वानांनी काय केले पाहिजे, यावषियी . -