Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 10

65 Mantra
23/10
Devata- सूर्यो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सूर्य॑ऽएका॒की च॑रति च॒न्द्रमा॑ जायते॒ पुनः॑। अ॒ग्निर्हि॒मस्य॑ भेष॒जं भूमि॑रा॒वप॑नं म॒हत्॥१०॥

सूर्यः॑। ए॒का॒की। च॒र॒ति॒। च॒न्द्रमाः॑। जा॒य॒ते॒। पुन॒रिति॒ऽपुनः॑। अ॒ग्निः। हि॒मस्य॑। भे॒ष॒जम्। भूमिः॑। आ॒वप॑न॒मित्या॒वप॑नम्। म॒हत्॥१० ॥

Mantra without Swara
सूर्यऽएकाकी चरति चन्द्रमा जायते पुनः । अग्निर्धिमस्य भेषजम्भूमिरावपनम्महत् ॥

सूर्यः। एकाकी। चरति। चन्द्रमाः। जायते। पुनरितिऽपुनः। अग्निः। हिमस्य। भेषजम्। भूमिः। आवपनमित्यावपनम्। महत्॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे प्रश्‍नांची उत्तरें जाणून घेण्याची इच्छा करणार्‍या मनुष्यांनो, ऐका (सूर्य्यः) सूर्य (एकाकी) कोणाच्या साहाय्याशिवाय आपल्या निवत कक्षेत एकावी (चरति) फिरत आहे. (पुनः) नंतर या सूर्याच्या प्रकाशाने (चन्द्रमाः) चंद्रलोक (जायते) प्रकाशित होतो आहे. (अग्निः) आग (हिमस्य) शीतत्व गुणावर (भेषजम्) औषध व उपचार असून (भूमिः) पृथ्वी (महत्) महान विशाल ते स्थान आहे की जे (आवपनम्) बी पेरण्याचे ठिकाण वा क्षेत्र आहे. हे सर्व तुम्ही नीट लक्षात ठेवा ॥10॥
Essence
भावार्थ - या सृष्टीत सूर्यलोक आपल्या स्वतःच्या आकर्षण शक्तीद्वारा आपल्या कक्षेत परिभ्रमण करीत आहे. आणि त्याच्याच प्रकाशाने चंद्रलोकादी लोक प्रकाशित होत आहेत. थंडीच्या निवारणासाठी अग्नीसारखा दुसरा कोणताही पदार्थ नाही आणि विविध (धान्य, वनस्पती आदी) पदार्थ बी पेरण्या व उगवण्यासाठी या पृथ्वी सारखे विशाल असे कोणतेही स्थान नाही. हे तथ्य सर्व मनुष्यांनी जाणून घ्यावे. ॥10॥
Subject
मरगील मंत्रातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे सांगताहेत.-