Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 1

65 Mantra
23/1
Devata- परमेश्वरो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ऽआसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥१॥

हि॒र॒ण्य॒ग॒र्भ इति॑ हिरण्यऽग॒र्भः। सम्। अ॒व॒र्त्त॒त॒। अग्रे॑। भू॒तस्य॑। जा॒तः। पतिः॑। एकः॑। आ॒सी॒त्। सः। दा॒धा॒र॒। पृ॒थि॒वीम्। द्याम्। उ॒त। इ॒माम्। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥१ ॥

Mantra without Swara
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीन्द्यामुतेमाङ्कस्मै देवाय हविषा विधेम ॥

हिरण्यगर्भ इति हिरण्यऽगर्भः। सम्। अवर्त्तत। अग्रे। भूतस्य। जातः। पतिः। एकः। आसीत्। सः। दाधार। पृथिवीम्। द्याम्। उत। इमाम्। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तो परमात्मा (भुतस्थ) उत्पन्न झालेल्या कार्यरूप सृष्टीच्या (अग्ने) आधी (होता व आहे) तो (हिरण्यगर्भः) सूर्य, चंद्र आणि तारागण आदी सर्व ज्योती ज्याच्या गर्भात गर्भस्थरूपाने स्थित असून तोच सूर्य आदी कारणरूप पदार्थांमधे गर्भाप्रमाणे व्यापक आहे, तोच स्तुती करण्यास पात्र वा एकमेव उपास्यदेव (समर्वतत) विद्यमान असून तोच या सर्व सृष्टीचा (एक) एकमेव (जातः) प्रसिद्ध (पतिः) पालन करणारा (आसीत्) होता व आहे. (सः) तोच (इमाम्) या (पृथिवीम्) विशाल पृथ्वीची (उर) आणि (द्याम्) सूर्य आदी लोकांची रचना करून (दाधार) तीन्ही काळात धारण करतो. त्या (कस्मै) सुखरूप (देवास) सुखरूप परमात्म्याला आम्ही, विद्वान माणसें (हविषा) सर्वस्व दान करून त्याची (विधेम) विशेष परिचर्या, सेवा (उपासना) करतो, तद्वत तुम्ही सर्व जणही करीत जा ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जेव्हां ही सृष्टी प्रलयकाळ आल्यानंतर प्रकृती (या अनादि तत्त्वामधे स्थिर होते आणि सृष्टीची वेळ आल्यानंतर पुन्हा उत्पन्न होते, त्यावेळी (वा त्या प्रलय ते सृष्टीरचना या काळात जाणणारा असा एकमेव परमेश्‍वर असतो. त्याकाळी सर्व जीवात्मा मूर्छित सारख्या अवस्थेत असतात. तो (अमर अनादी परमेश्‍वर) कल्पान्तानंतर प्रकाशरहित पृथ्वी आदी सृष्टीची तसेच प्रकाशसहित असलेल्या सूर्य आदी लोकांची रचना व धारण करतो. तसेच सर्व जीवांच्या कर्माप्रमाणे त्यांना जन्म देऊन त्यांच्या जीवन निर्वाहासाठी सर्व उपभोग योग्य पदार्थांची व्यवस्था करतो. असा तो देवच सर्वांसाठी उपासनीय आहे, अन्य कोणी नव्हे, हे सर्वांनी नीट लक्षात घ्यावे. ॥1॥
Subject
आता तेवीसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या या अध्यायाच्या प्रथम मंत्रात, ईश्‍वर काय करतो, हे सांगितले आहे.-