Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 34

34 Mantra
22/34
Devata- यज्ञो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
एक॑स्मै॒ स्वाहा॑ द्वाभ्या॒ स्वाहा॑ श॒ताय॒ स्वाहैक॑शताय॒ स्वाहा॑ व्युड्टष्ट्यै॒ स्वाहा॑ स्व॒र्गाय॒ स्वाहा॑॥३४॥

एक॑स्मै। स्वाहा॑। द्वाभ्या॑म्। स्वाहा॑। श॒ताय॑। स्वाहा॑। एक॑शता॒येत्येक॑ऽशताय। स्वाहा॑। व्युष्ट्या॒ इति॒ विऽउ॑ष्ट्यै॒। स्वाहा॑। स्व॒र्गायेति॑ स्वः॒ऽगाय॑। स्वाहा॑ ॥३४ ॥

Mantra without Swara
एकस्मै स्वाहा द्वाभ्याँ स्वाहा शताय स्वाहैकशताय स्वाहा व्युष्ट्यै स्वाहा स्वर्गाय स्वाहा॥

एकस्मै। स्वाहा। द्वाभ्याम्। स्वाहा। शताय। स्वाहा। एकशतायेत्येकऽशताय। स्वाहा। व्युष्ट्या इति विऽउष्ट्यै। स्वाहा। स्वर्गायेति स्वःऽगाय। स्वाहा॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मुनष्यांनो, तुम्हा सर्वांनी (एकस्मै) त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरासाठी (स्वाहा) सत्य क्रिया (सत्य उपासना केली पाहिजे) तसेच (द्वाभ्याम्‌) दोन्हासाठी म्हणजे कार्य आणि कारणासाठी (स्वाहा) सत्यक्रिया केली पाहिजे (शताय) जगातील अनेक पदार्थांसाठी (स्वाहा) उत्तम क्रिया केली पाहिजे. (एंकशताय) एकशत व्यवहारांसाठी वा पदार्थांसाठी (स्वाहा) तुम्ही उत्तम क्रिया करावी. (व्युष्ट्यै) प्रकाशित वा ज्वलनशील पदार्थांमधे प्रज्वलन क्रिया उत्पन्न करण्यासाठी (स्वाहा) उत्तम क्रिया करावी तसेच (स्वर्गाय) सुखप्राप्तीसाठी (स्वाहा) उत्तम क्रिया वा सत्कर्में योग्य रीतीने अवश्य केली पाहिजेत. ॥34॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी, ज्या समान अन्य कोणी नाही, अशा परमेश्वराची विशेषत्वाने भक्ती अवश्य करावी. तवेच तो ईश्वर आपली प्रीती देऊन व पुरुषार्थाची प्रेरणा देऊन असंख्य जीवात्म्यांना प्रसन्न करील. यामुळे जगात सुख- आनंद नांदेल व जीवांना मोक्ष-सुख मिळेल. ॥34॥
Subject
यज्ञाचे अनुष्ठान कशासाठी करावे, यावषियी -
Footnote
या बाविसाव्या अध्यायात आयु, बुद्धी अग्नींचे गुण, कर्म, यज्ञ गायत्री मंत्राचा अर्थ आणि सर्व पदार्थांच्या शुद्धीकरण वा शोधन विषयी वर्णन केले आहे. त्यामुळे या अध्यायाच्या अर्थाची संगती मागील एकविसाव्या अध्यायाशी आहे, हे जाणून घ्यावे.^यजुर्वेद 22 वा अध्यायाचा मराठी भाषानुवाद समाप्त