Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 26

34 Mantra
22/26
Devata- वातादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराडभिकृतिः Swara- ऋषभः
Mantra with Swara
वाता॑य॒ स्वाहा॑ धू॒माय॒ स्वाहा॒भ्राय॒ स्वाहा॑ मे॒घाय॒ स्वाहा॑ वि॒द्योत॑मानाय॒ स्वाहा॑ स्त॒नय॑ते॒ स्वाहा॑व॒स्फूर्ज॑ते॒ स्वाहा॒ वर्ष॑ते॒ स्वाहा॑व॒वर्ष॑ते॒ स्वाहो॒ग्रं वर्ष॑ते॒ स्वाहा॑ शी॒घ्रं वर्ष॑ते॒ स्वाहो॑द्गृह्ण॒ते स्वाहोद्गृ॑हीताय॒ स्वाहा॑ प्रुष्ण॒ते स्वाहा॑ शीकाय॒ते स्वाहा॒ प्रुष्वा॑भ्यः॒ स्वाहा॑ ह्रा॒दुनी॑भ्यः॒ स्वाहा॑ नीहा॒राय॒ स्वाहा॑॥२६॥

वाता॑य। स्वाहा॑। धू॒माय॑। स्वाहा॑। अ॒भ्राय॑। स्वाहा॑। मे॒घाय॑। स्वाहा॑। वि॒द्योत॑माना॒येति॑ वि॒ऽद्योत॑मानाय। स्वाहा॑। स्त॒नय॑ते। स्वाहा॑। अ॒व॒स्फूर्ज॑त॒ इत्य॑व॒ऽस्फूर्ज॑ते। स्वाहा॑। वर्ष॑ते। स्वाहा॑। अ॒व॒वर्ष॑त॒ इत्य॑व॒ऽवर्ष॑ते। स्वाहा॑। उ॒ग्रम्। वर्ष॑ते। स्वाहा॑। शी॒घ्रम्। वर्ष॑ते। स्वाहा॑। उ॒द्गृ॒ह्ण॒त इत्यु॑त्ऽगृह्ण॒ते। स्वाहा॑। उद्गृ॑हीता॒येत्युत्ऽगृ॑हीताय। स्वाहा॑। प्रु॒ष्ण॒ते। स्वाहा॑। शी॒का॒य॒ते। स्वाहा॑। प्रुष्वा॑भ्यः। स्वाहा॑। ह्रा॒दुनी॑भ्यः। स्वाहा॑। नी॒हा॒राय॑। स्वाहा॑ ॥२६ ॥

Mantra without Swara
वाताय स्वाहा धूमाय स्वाहाभ्राय स्वाहा मेघाय स्वाहा विद्योतमानाय स्वाहा स्तनयते स्वाहावस्फूर्जते स्वाहा वर्षते स्वाहाववर्षते स्वाहोद्रँवर्षते स्वाहा शीघ्रँवर्षते स्वाहोद्गृह्णते स्वाहोद्गृहीताय स्वाहा प्रुष्णते स्वाहा शीकायते स्वाहा प्रुष्वाभ्यः स्वाहा ह्रादुनीभ्यः स्वाहा नीहाराय स्वाहा ॥

वाताय। स्वाहा। धूमाय। स्वाहा। अभ्राय। स्वाहा। मेघाय। स्वाहा। विद्योतमानायेति विऽद्योतमानाय। स्वाहा। स्तनयते। स्वाहा। अवस्फूर्जत इत्यवऽस्फूर्जते। स्वाहा। वर्षते। स्वाहा। अववर्षत इत्यवऽवर्षते। स्वाहा। उग्रम्। वर्षते। स्वाहा। शीघ्रम्। वर्षते। स्वाहा। उद्गृह्णत इत्युत्ऽगृह्णते। स्वाहा। उद्गृहीतायेत्युत्ऽगृहीताय। स्वाहा। प्रुष्णते। स्वाहा। शीकायते। स्वाहा। प्रुष्वाभ्यः। स्वाहा। ह्रादुनीभ्यः। स्वाहा। नीहाराय। स्वाहा॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्या लोकांनी (वाताय) वाहणाऱ्या वायूसाठी (स्वाहा) त्याला शुद्ध करण्याची यज्ञक्रिया केली (वा करीत आहेत) तसेच जे लोक (धूमाय) धुरासाठी (स्वाहा) (धूर दूर होऊन वायू प्रदूषणरहित होण्यासाठी) यज्ञक्रिया) करतात (ते लोक साऱ्या जगाचे प्राणप्रिय ठरतात) जे लोक (अम्राय) वृष्टीरचनेचे कारण असलेल्या (स्वाहा) तसेच (मेघाय) प्रत्यक्ष बरसणाऱ्या मेघाकरिता (स्वाहा) यज्ञक्रिया करतात तसेच जे (विद्योतमानाय) विद्युताद्वारे संचालित होणाऱ्या संधन सजल मेधासाठी (स्वाहा) आणि (स्तनयते) उत्तम नाद करणाऱ्या विद्युतेसाठी (स्वाहा) शुद्ध करणारी यज्ञक्रिया करतात (ते संसाराला प्रिय असतात) (अवस्फूर्जते) एकमेकाशी झालेल्या घर्षणामुळे खाली भूमीकडे प्रहार करणाऱ्या विजेसाठी (स्वाहा) जे शुद्धीकरण करतात (आकाशस्थ विद्युत ऊर्जेंचा योग्य विनियोग करतात) तसेच (वर्तते) बरसणाऱ्या ढगासाठी (स्वाहा) जे यज्ञक्रिया करतात (ते जगाला प्राणप्रिय असतात) (अववर्षते) आकाशातील शुद्ध जल ज्यामधे असते, त्या सर्वांहून उच्चस्थानी असलेल्या ढगापैकी सर्वात भिन्न असलेल्या ढगासाठी (स्वाहा) आणि (शीघ्रम्‌) शीघ्रतेने मोठा घनघोर पाऊस वर्ष ते पाडणाऱ्या ढगासाठी जे (स्वाहा) यज्ञकर्म करतात (ते सर्वांना प्रिय ठरतात) (उद्गृह्णते) सर्वाहून उच्चस्थानी असलेल्या मेघांचे पाणी ओढून घेणाऱ्या मेघासाठी (स्वाहा) तसेच (उद्गृहीताय) ज्याद्वारे वरच्यावर जलाचे आकर्षण होते, त्या मेघासाठी (स्वाहा) जे शुद्ध करणारी यज्ञक्रिया करतात, (ते सर्वप्रिय होतात) (पुष्णते) पुष्टी करणाऱ्या मेघासाठी (स्वाहा) तसेच (शीकायते) जो राहून-राहून बरसतो, त्या मेघासाठी (स्वाहा) जे यज्ञक्रिया करतात, तसेच (प्रष्वाभ्यः) जे ढग पूर्ण व भरपूर पाऊस पाडतात, त्या मेघांच्या अवयवासाठी (स्वाहा) जे यज्ञक्रिया करतात, (ते सर्वप्रिय होतात) (ह्रातदुनीभ्यः) अव्यक्त शब्द म्हणजे गडगडणाऱ्या मेघासाठी (स्वाहा) शुद्धी करणारी यज्ञक्रिया जे करतात, तसेच (नीहाराय) धुक्यासाठी (स्वाहा) त्याची शुद्धी करण्याची यज्ञक्रिया जे करतात, ते सर्व जगाचे प्राणप्रिय होतात वा असतात ॥26॥
Essence
missing
Subject
पुनश्च, त्याच विषयी -