Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 25

34 Mantra
22/25
Devata- जलादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒द्भ्यः स्वाहा॑ वा॒र्भ्यः स्वाहो॑द॒काय॒ स्वाहा॒ तिष्ठ॑न्तीभ्यः॒ स्वाहा॒ स्रव॑न्तीभ्यः॒ स्वाहा॒ स्यन्द॑मानाभ्यः॒ स्वाहा॒ कूप्या॑भ्यः॒ स्वाहा॒ सूद्या॑भ्यः॒ स्वाहा॒ धार्या॑भ्यः॒ स्वाहा॑र्ण॒वाय॒ स्वाहा॑ समु॒द्राय॒ स्वाहा॑ सरि॒राय॒ स्वाहा॑॥२५॥

अ॒द्भ्य इत्य॒त्ऽभ्यः। स्वाहा॑। वा॒र्भ्य इति॑ वाः॒ऽभ्यः। स्वाहा॑। उ॒द॒काय॑। स्वाहा॑। तिष्ठ॑न्तीभ्यः। स्वाहा॑। स्रव॑न्तीभ्यः। स्वाहा॑। स्यन्द॑मानाभ्यः। स्वाहा॑। कूप्या॑भ्यः। स्वाहा॑। सूद्या॑भ्यः। स्वाहा॑। धार्य्या॑भ्यः। स्वाहा॑। अ॒र्ण॒वाय॑। स्वाहा॑। स॒मु॒द्राय॑। स्वाहा॑। स॒रि॒राय॑। स्वाहा॑ ॥२५ ॥

Mantra without Swara
अद्भ्यः स्वाहा वार्भ्यः स्वाहोदकाय स्वाहा तिष्ठन्तीभ्यः स्वाहा स्रवन्तीभ्यः स्वाहा स्यन्दमानाभ्यः स्वाहा कूप्याभ्यः स्वाहा सूद्याभ्यः स्वाहा धार्याभ्यः स्वाहार्णवाय स्वाहा समुद्राय स्वाहा सरिराय स्वाहा ॥

अद्भ्य इत्यत्ऽभ्यः। स्वाहा। वार्भ्य इति वाःऽभ्यः। स्वाहा। उदकाय। स्वाहा। तिष्ठन्तीभ्यः। स्वाहा। स्रवन्तीभ्यः। स्वाहा। स्यन्दमानाभ्यः। स्वाहा। कूप्याभ्यः। स्वाहा। सूद्याभ्यः। स्वाहा। धार्य्याभ्यः। स्वाहा। अर्णवाय। स्वाहा। समुद्राय। स्वाहा। सरिराय। स्वाहा॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्या लोकांनी यज्ञामधे सुगंधित पदार्थांची आहुती देऊन (अद्भ्यः) सामान्य जलासाठी (ओढा-नाल्यांचे पाण्यासाठी) (स्वाहा) ते जल शुद्ध करण्याची क्रिया केली आहे (वा करीत आहेत) तसेच जे लोक (वार्भ्यः) स्वीकार करण्यास, वापरण्यास योग्य जलाच्या (स्वाहा) करण्यास, वापरण्यास योग्य जलाच्या (स्वाहा) शद्धीकरणासाठी उत्तम क्रिया केली (वा करीत आहेत) (ते सर्वांसाठी सुखकारक होतात) ज्यांनी (उदकाय) पदार्थ ओले करण्यासाठी अथवा सूर्याच्या किरणांद्वारे ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या जलासाठी (स्वाहा) शद्धीकरण क्रिया केली, तसेच ज्यांनी (तिष्ठन्तीभ्यः) वाहणाऱ्या जलासाठी (स्वाहा) शद्धीकरण क्रिया केली (ते सर्वांना सुख देणारे असतात) (स्रवन्तीभ्यः) वेगाने वाहत असलेल्या जलासाठी (स्वाहा) तसेच (स्यन्दमानाभ्याम्‌) हळू हळू वाहणाऱ्या जलासाठी (स्वाहा) शद्धीकरण क्रिया केली (ते सर्वांना सुख देणारे होतात) (कूप्याभ्यः) विहीरीतील पाण्यासाठी (स्वाहा) तसेच (सूद्याभ्यः) चांगल्याप्रकारे व चिंब भिजविणाऱ्या पावसाच्या जलासाठी ज्यांनी (स्वाहा) शद्धीकरण क्रिया केली (ते सर्वांना सुख देतात) (धार्याभ्यः) धारण करण्यासठी (वापरण्यासाठी वा साठवण्यासाठी) जे पाणी आहे, (स्वाहा) त्याच्यासाठी तसेच (अर्णवाय) ज्यात भरपूर उदंड पाणी आहे, त्या नदीजलासाठी ज्यांनी (स्वाहा) शुद्धीकरण क्रिया केली (ते सर्वांना सुखकारी असतात) (समुद्राय) ज्या महाजलाशयात नदी, महानदी, नद, महानद, निर्झर आदीचे पाणी जाऊन मिळते त्या सागराच्या वा महासागराच्या जलांसाठी (स्वाहा) जे लो शद्धीकरण क्रिया करतात आणि जे (सरिराय) अती मनोहर जलाच्या (स्त्रोत्र, कारंजे आदीच्या (स्वाहा) पाण्याच्या रक्षण व शुद्धीकरणासाठी क्रिया करतात, ते सर्वांना सुखकारक होतात ॥25॥
Essence
भावार्थ - जे लोक अग्नीत सुवासिक पदार्थांद्वारे होम करतात, ते (त्या कर्माद्वारे) जल (पवन आदी) पदार्थांचे शुद्धी करण करून पुण्यात्मा ठरतात. तसेच हे सर्वांनी जाणून घ्यावे की पाण्याच्या शुद्धतेनेच सर्व पदार्थांचे शुद्धीकरण होते ॥25॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -