Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 23

34 Mantra
22/23
Devata- प्राणादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
प्रा॒णाय॒ स्वाहा॑ऽपा॒नाय॒ स्वाहा॑ व्या॒नाय॒ स्वाहा॒ चक्षु॑षे॒ स्वाहा॒ श्रोत्रा॑य॒ स्वाहा॑ वा॒चे स्वाहा॒ मन॑से॒ स्वाहा॑॥२३॥

प्रा॒णाय॑। स्वाहा॑। अ॒पा॒नाय॑। स्वाहा॑। व्या॒नायेति॑ विऽआ॒नाय॑। स्वाहा॑। चक्षु॑षे। स्वाहा॑। श्रोत्रा॑य। स्वाहा॑। वा॒चे। स्वाहा॑। मन॑से। स्वाहा॑ ॥२३ ॥

Mantra without Swara
प्राणाय स्वाहापानाय स्वाहा व्यानाय स्वाहा चक्षुषे स्वाहा श्रोत्राय स्वाहा वाचे स्वाहा मनसे स्वाहा ॥

प्राणाय। स्वाहा। अपानाय। स्वाहा। व्यानायेति विऽआनाय। स्वाहा। चक्षुषे। स्वाहा। श्रोत्राय। स्वाहा। वाचे। स्वाहा। मनसे। स्वाहा॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्या मनुष्यांनी (प्राणाय) शरीराच्या आतून बाहेर जाणाऱ्या वायूसाठी (स्वाहा) योगविद्येप्रमाणे यत्न केले किंवा ज्यांनी (अपानाय) बाहेरून शरीरात येणाऱ्या वायूसाठी आणि (व्यानाय) शरीराच्या विभिन्न अवयवांमधे संचारित होणाऱ्या वायूसाठी (स्वाहा) प्रत्यक्ष प्रमाणानुसारे सांगून (डोळ्याने स्वतः पाहिले, ते खरे मानून) यत्न केले, ज्यांनी (श्रोत्राय) ज्यामुळे ऐकू येते, त्या कर्णेन्द्रियाने (स्वाहा) शास्त्रज्ञ विद्वानाच्या उपदेश ऐकले, (वाचे) ज्यामुळे बोलता येते, त्या वाणीसाठी (स्वाहा) सत्यभाषणाचा अभ्यास केला आणि तसेच आपले आचरण, कार्यादी ठेवले (बोले तैसा चाले) तसेच ज्यानी (मनसे) विचारांचे कारण आणि संकल्प-विकल्पात्मक जे मन, त्या मनासठी (स्वाहा) विचारप्रवण वाणीचा प्रयोग केला म्हणजे योग्य त्या प्रमाणात वाणीचा सदुपयोग केला, ती माणसें अवश्य विद्वान होतात. ॥23॥
Essence
भावार्थ- जे लोक यज्ञाद्वारे शुद्ध केलेल्या पाण्याचे औषधी, वायू, अन्न, पत्र, पुष्प, फळें, रस, कंद म्हणजे अरबी बटाटे, कसेरू (??) रताळू आणि शकरकंद आदी पदार्थांचे सेवन करतात वा त्यापासून निर्मित भोजन करतात, ते सदैव नीरोग राहून त्यांची बुद्धी, शक्ती, आरोग्य सुधारते व ते दीर्घजीवी होतात. ॥23॥
Subject
होमाचे विधान वा आवश्यकता कशासाठी अथवा होम का करावा, याविषयी -