Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 2

34 Mantra
22/2
Devata- विद्वांसो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒माम॑गृभ्णन् रश॒नामृ॒तस्य॒ पूर्व॒ऽआयु॑षि वि॒दथे॑षु क॒व्या। सा नो॑ऽअ॒स्मिन्त्सु॒तऽआब॑भूवऽऋ॒तस्य॒ साम॑न्त्स॒रमा॒रप॑न्ती॥२॥

इ॒माम्। अ॒गृ॒भ्ण॒न्। र॒श॒नाम्। ऋ॒तस्य॑। पूर्वे॑। आयु॑षि। वि॒दथे॑षु। क॒व्या। सा। नः॒। अ॒स्मिन्। सु॒ते। आ। ब॒भू॒व॒। ऋ॒तस्य॑। साम॑न्। स॒रम्। आ॒रप॒न्तीत्या॒ऽरप॑न्ती ॥२ ॥

Mantra without Swara
इमामगृभ्णन्रशनामृतस्य पूर्व आयुषि विदथेषु कव्या । सा नोऽअस्मिन्त्सुत आऽबभूवऽऋतस्य सामन्त्सरमारपन्ती ॥

इमाम्। अगृभ्णन्। रशनाम्। ऋतस्य। पूर्वे। आयुषि। विदथेषु। कव्या। सा। नः। अस्मिन्। सुते। आ। बभूव। ऋतस्य। सामन्। सरम्। आरपन्तीत्याऽरपन्ती॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (हे जाणून घ्या की बुद्धी ही ती शक्ती आहे की जी) (ऋतस्य) सत्याच्या (मूळ कारणच्या) (सरम्‌) शोध घेण्यासाठी (आरपन्ती) चांगल्याप्रकारे शब्द अधारित (अबभूव) करविते अथवा (उच्चारणादी क्रियेचे ती मूळ कारण आहे, अशी तिची ख्याती आहे) तसेच (इमाम्‌) या (ऋतस्य) सत्य कारणाचे (ज्ञान होण्यासाठी) ही (रशनाम्‌) लांब अशी दोरी आहे. (विदथेषु) यज्ञादी कार्यात (पूर्वे) सर्वप्रथम (आयुषि) प्राणधारण आणि दीर्घजीवन यांसाठी (कव्या) मेधावीजन (आगृम्णन्‌) (या बुद्धीचेच) ग्रहण करतात (यज्ञाद्वारे दीर्घजीवन कसे प्राप्त करावे, हे मेधावीज बुद्धीद्वारेच शोधून काढतात) (सा) अशी बुद्धी (अस्मिन्‌) या (सूत) उत्पन्न झालेल्या जगात (नः) आम्हा (मनुष्य मात्रासाठी) (सामान्‌) जीवनाचे अंतापर्यंत साथ देते आणि (हाती घेतलेल्या) कार्याला समाप्तीपर्यंत नेते ॥2॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे दोरीने बांधलेला प्राणी इकडे तिकडे धावू शकत नाही, तद्वत योग्य रीतीने धारण केलेले आयुष्य (नियमित जीवन) समाप्तीची वेळ आल्याशिवाय सामाप्त होऊ शकत नाही (नियंत्रित, संतुलिक आहार-विहार, सुविचार असल्यास अकालमृत्यू येऊ शकत नाही.) ॥2॥
Subject
मनुष्यांनी आयुष्य वा दीर्घ जीवन कशाप्रकारे प्राप्त करावे या विषयी -