Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 18

34 Mantra
22/18
Devata- पवमानो देवता Rishi- अरुणत्रसदस्यू ऋषी Chhand- पिपीलिकामध्या विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अजी॑जनो॒ हि प॑वमान॒ सूर्य्यं॑ वि॒धारे॒ शक्म॑ना॒ पयः॑।गोजी॑रया॒ रꣳह॑माणः॒ पुर॑न्ध्या॥१८॥

अजी॑जनः। हि। प॒व॒मा॒न। सूर्य॑म्। वि॒ऽधार॒ इति॑ वि॒ऽधारे॑। शक्म॑ना। पयः॑। गोजी॑र॒येति॒ गोऽजी॑रया। रꣳह॑माणः। पुर॒न्ध्येति॒ पुर॑म्ऽध्या ॥१८ ॥

Mantra without Swara
अजीजनो हि पवमान सूर्यँविधारे शक्मना पयः । गोजीरया रँहमाणः पुरन्ध्या ॥

अजीजनः। हि। पवमान। सूर्यम्। विऽधार इति विऽधारे। शक्मना। पयः। गोजीरयेति गोऽजीरया। रꣳहमाणः। पुरन्ध्येति पुरम्ऽध्या॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (पवमान) पवित्र करणाऱ्या अग्नीप्रमाणे पवित्र असलेल्या हे पवित्र मनुष्या, जो अग्नी (पुरन्ध्या) नगरीला विशेष पद्धतीने धारण करीत आहे (विद्युत रूप अग्नी नगरांचा प्राणरूप आहे) त्या पद्धतीने (रंहमाणः) कार्य करीत (अग्नीचा उपयोग घेत) (सूर्यम्‌) सूर्याला (अजीजनः) प्रकट वा व्यक्त करतो (विद्युत अग्नी व सूर्यरूप अग्नी एकमेकाला पूरक होऊन समाजजीवनाला धारण करीत आहेत) त्याचप्रकारे मी (एक नागरिक) (शक्मना) कर्माद्वारो अथवा (गोजीरया) गौ आदी पशूंच्या जीवनचर्येद्वारे (पयः) जलाला मी (विधारे) विशेषत्वाने (हि) अवश्य धारण करतो. (सूर्य आणि विद्युतग्नी नगरास ऊर्जा देतात व नागरिकांनी पशुपालन आणि जलसंधारण क्रिया करावी) ॥18॥
Essence
भावार्थ - जर विद्युत शक्ती सूर्याचे कारण नसती तर सूर्याची उत्पत्ती कशी झाली असती? अर्थात (विद्युतशक्ती ही सूर्याचे मूळ शक्तिस्तोत्र आहे) तसेच जर सूर्य नसता, तर भूगोलाचे (त्यावरील प्राण्यांचे) जीवन कसे राहिले असते? आणि वृद्धी न झाल्यामुळे गौ आदी पशंचे जगणे शक्य झाले असते का? अर्थातच ते अशक्य होते. ॥18॥
Subject
पुढील मंत्रात सूर्यरूप अग्नी कसा आहे, याविषयी -