Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 17

34 Mantra
22/17
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वरूप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒ग्निं दू॒तं पु॒रो द॑धे हव्य॒वाह॒मुप॑ब्रुवे।दे॒वाँ२ऽआ सा॑दयादि॒ह॥१७॥

अ॒ग्निम्। दू॒तम्। पु॒रः। द॒धे॒। ह॒व्य॒वाह॒मिति॑ हव्य॒ऽवाह॑म्। उप॑। ब्रु॒वे॒। दे॒वान्। आ। सा॒द॒या॒त्। इ॒ह ॥१७ ॥

Mantra without Swara
अग्निन्दूतं पुरो दधे हव्यवाहमुप ब्रुवे । देवाँऽआसादयादिह ॥

अग्निम्। दूतम्। पुरः। दधे। हव्यवाहमिति हव्यऽवाहम्। उप। ब्रुवे। देवान्। आ। सादयात्। इह॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रभु आदेश देत आहेत) हे मनुष्यानो, (इह) या जगात जो (देवान्‌) द्विय भोग (उत्तम उपभोग्य पदार्थ) - तुम्हाला (आ, सादयात्‌) प्राप्त करवितो, त्या (हव्यावाहम्‌) भोजनासाठी योग्य पदार्थांची प्राप्ती करून देणाऱ्या (दूतम्‌) आणि दूताप्रमाणे सर्व ईत्सित कार्यांची सिद्धी करणाऱ्या (अग्नीम्‌) अग्नीला (पुरः) (मी, परमेश्वर अथवा मी पुरोहित) तुमच्या समोर वा तुमच्या उपयोगासाठी (दधे) देत आहे. तसेच तुम्हांसमोर (उप, ब्रुवे) उपदेश करीत आहे की तुम्हीदेखील अशाप्रकारे करीत जा (यज्ञ, भोजनादी कार्यात अग्नीचा उपयोग करण्याचा विधी इतरांना सांगत जा ॥10॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जसा हा अग्नी दिव्य सुख प्रदान करणारा आहे, तसे पवन आदी पदार्थदेखील सुख देण्यास समर्थ आहेत, हे तुम्ही जाणून घ्या. ॥17॥
Subject
आता अग्नीच्या गुणां विषयी -