Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 16

34 Mantra
22/16
Devata- अग्निर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स ह॑व्य॒वाडम॑र्त्यऽउ॒शिग्दू॒तश्चनो॑हितः।अ॒ग्निर्धि॒या समृ॑ण्वति॥१६॥

सः। ह॒व्य॒वाडिति॑ हव्य॒ऽवाट्। अम॑र्त्यः। उ॒शिक्। दू॒तः। चनो॑हित॒ इति चनः॑ऽहितः। अ॒ग्निः। धि॒या। सम्। ऋ॒ण्व॒ति॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
स हव्यवाडमर्त्यऽउशिग्दूतश्चनोहितः । अग्निर्धिया समृण्वति ॥

सः। हव्यवाडिति हव्यऽवाट्। अमर्त्यः। उशिक्। दूतः। चनोहित इति चनःऽहितः। अग्निः। धिया। सम्। ऋण्वति॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हा अग्नी (अमर्त्यः) मरणधर्मापासून दूर (परमाणुरूपेण अविनाशी म्हणून अमर) आहे, तो (हव्यवाट्) होम केलेल्या पदार्थांना एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत नेतो. हा (उशिक्‌) प्रकाशमान असून (दूतः) दूताप्रमाणे आहे तसेच (चनोहितः) अन्न-धान्यादीची प्राप्ती करून देणारा आहे. असा (अग्नीः) (सः) तो अग्नी (धिया) योग्य त्या पद्धतीने कर्म केल्यास, बुद्धी व युक्तिपूर्वक याचा वापर केल्यास (सम्‌, ऋण्वति) चांगल्याप्रकारे परिणाम व लाभ मिळवून देतो ॥16॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे योग्य त्या कार्यासाठी पाठविलेला एक दूत सोपविलेले काम पूर्ण करतो, तसे चांगल्या व योग्य त्या रीतीने प्रयुक्त अग्नी सुख-सोयी देणारी कामें पूर्ण करतो ॥16॥
Subject
तो अग्नी कसा आहे, याविषयी -