Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 15

34 Mantra
22/15
Devata- अग्निर्देवता Rishi- सुतम्भर ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒ग्निꣳ स्तोमे॑न बोधय समिधा॒नोऽअम॑र्त्यम्। ह॒व्या दे॒वेषु॑ नो दधत्॥१५॥

अ॒ग्निम्। स्तोमे॑न। बो॒ध॒य॒। स॒मि॒धा॒न इति॑ सम्ऽइधा॒नः। अम॑र्त्यम्। ह॒व्या। दे॒वेषु॑। नः॒। द॒ध॒त्॥१५ ॥

Mantra without Swara
अग्निँ स्तोमेन बोधय समिधानोऽअमर्त्यम् । हव्या देवेषु नो दधत् ॥

अग्निम्। स्तोमेन। बोधय। समिधान इति सम्ऽइधानः। अमर्त्यम्। हव्या। देवेषु। नः। दधत्॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (यज्ञकर्ता वा यजमान) (यज्ञकुंडात) (समिधानः) चांगल्याप्रकारे पेटलेला अग्नी (देवेषु) दिव्य वायू आदी पदार्थांमधे (हव्या) आदान-प्रदान करण्यास योग्य अशा पदार्थांना (नः) आम्हा सर्वांसाठी (दधत्‌) धारण करतो (यज्ञात आहुत सुगंधित व पौष्टिक पदार्थांना अग्नी सर्वांसाठी उपयोगी व पुष्टिकारक करतो) त्या (अमर्त्यम्‌) कारणरूपेण अविनाशी म्हणजे केव्हांही पूर्ण विनाश न पावता परमाणुरूपेण अविनाशी अशा (अग्निम्‌) अग्नीला तुम्ही (याज्ञिकगण) (स्तोमेन) समिधादी साहित्याच्या साहाय्याने (वोधय) प्रज्वलित ठेवा म्हणजे चांगल्याप्रकारे प्रदीप्त करा. ॥15॥
Essence
भावार्थ - जर अग्नीमधे समिधा टाकून त्यात दिव्य सुगंधित पदार्थांची आहुती घातली जाईल, तर हा अग्नी त्या पदार्थांचा प्रसार वायुमंडलात करतो आणि अशाप्रकारे सर्व प्राण्यांना सुखी, आनंदी करतो ॥15॥
Subject
आता यज्ञकर्माविषयी -