Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 14

34 Mantra
22/14
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- पिपीलिकामध्या निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ सवि॒तुर्म॒तिमा॑स॒वं वि॒श्वदे॑व्यम्। धि॒या भगं॑ मनामहे॥१४॥

दे॒वस्य॑। स॒वि॒तुः। म॒तिम्। आ॒स॒वमित्या॑ऽस॒वम्। वि॒श्वदे॑व्य॒मिति॑ वि॒श्वऽदे॑व्यम्। धि॒या। भग॑म्। म॒ना॒म॒हे॒। १४ ॥

Mantra without Swara
देवस्य सवितुर्मतिमासवँविश्वदेव्यम् । धिया भगम्मनामहे ॥

देवस्य। सवितुः। मतिम्। आसवमित्याऽसवम्। विश्वदेव्यमिति विश्वऽदेव्यम्। धिया। भगम्। मनामहे।१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही (उपासक) (सवितुः) संपूर्ण ऐश्वर्यवान आणि (देवस्य) समस्त सुख देणाऱ्या परमेश्वरापासून (मतिम्‌) बुद्धी (आसवम्‌) आणि समस्त ऐवर्यप्राप्तीची साधनें (इंद्रियें, निर्मळ मन, भौतिक पदार्थ आदी) प्राप्त करीत आहोत आणि त्या (धिया) उत्तम बुद्धीद्वारे समस्त (विश्वदेव्यम्‌) सर्व विद्वानांचे हित करणाऱ्या (भगम्‌) ऐश्वर्याची (मनामहे) त्या परमेश्वराजवळ याचना करीत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीदेखील करा (परमेश्वराकडून प्राप्त सद्सबुद्धीचा उपयोग स्वार्थासाठी नव्हे. तर सर्वांच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्वांनी परमेश्वराच्या उपासनेद्वारे उत्तम बुद्धी प्राप्त करून त्याद्वारे पूर्ण ऐश्वर्य प्राप्त करून सर्व प्राण्यांच्या कल्याणा करिता त्याचा उपयोग केला पाहिजे ॥14॥
Subject
पुनश्च, तोच विषय -