Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 8

61 Mantra
21/8
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- निचृद गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
आ नो॑ मित्रावरुणा घृ॒तैर्गव्यू॑तिमुक्षतम्। मध्वा॒ रजा॑सि सुक्रतू॥८॥

आ। नः॒। मि॒त्रा॒व॒रु॒णा॒। घृ॒तैः। गव्यू॑तिम्। उ॒क्ष॒त॒म्। मध्वा॑। रजा॑ꣳसि। सु॒क्र॒तू॒ इति॑ सुऽक्रतू ॥८ ॥

Mantra without Swara
आ नो मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् । मध्वा रजाँसि सुक्रतू ॥

आ। नः। मित्रावरुणा। घृतैः। गव्यूतिम्। उक्षतम्। मध्वा। रजाꣳसि। सुक्रतू इति सुऽक्रतू॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (मित्रावरुणा) प्राण आणि उदान या वायूप्रमाणे आचरण करणाऱ्या (सुक्रतू) शुभ विचारवान आणि उत्तम कर्म करणाऱ्या शिल्पी (अभियंता, कारागीर, यंत्रज्ञ आदी) लोकहो, तुम्ही (घृतैः) जलाने (जलमार्गाद्वारे) (नः) आमच्याकरिता (गव्यूतिम्‌) दोन कोस (वा अधिक) अंतरापर्यंत (उक्षतम्‌) सेवन करा (आम्हा इतर जनांना साहाय्य करण्यासाठी जलमार्गाने दूर दूर पर्यंत जा) आणि (आ, मध्वा) सर्व दिशांत मधुर जलाच्या प्रसार विस्तार करीत (रजांसि) विविध लोकांचे (विदेशाचे) सेचन करा (तेथपर्यंत जा) ॥8॥ (प्राण = जीवनाधार वायू, उदान वायू-स्थान कंठ-गति कंठापासून हृदयापर्यंत)
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे (म्हणजे उपमा आहे, पण त्याचा वाचक शब्द ‘यथा` ‘न` ‘जसे` ‘तसे` ‘प्रमाणे` हे शब्द नाहीत. वरील मंत्रात ‘मित्रावरूणा` शब्दात उपमा आहे, पण वाचक शब्द ‘प्रमाणे` नाही) जे शिल्पीजन शिल्पीविद्येप्रमाणे नौका आदीची निर्मिती, संचालन आदी करीत जलमार्गाने दूरदूर जातील, ते (समुद्राच्या) पाण्यावरून तसेच पाण्याखालून (पाणबुडी आदी) द्वारा कुठेही जाण्यास समर्थ होतील ॥8॥
Subject
पुन्हा तोच विषय -