Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 7

61 Mantra
21/7
Devata- स्वर्ग्यानौर्देवता Rishi- गयप्लात ऋषिः Chhand- यवमध्या गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
सु॒नाव॒मा रु॑हेय॒मस्र॑वन्ती॒मना॑गसम्। श॒तारि॑त्रा स्वस्तये॑॥७॥

सु॒नाव॒मिति॑ सु॒ऽनाव॑म्। आ। रु॒हे॒य॒म्। अस्र॑वन्तीम्। अना॑गसम्। श॒तारि॑त्रा॒मिति॑ श॒तऽअ॑रित्राम्। स्व॒स्तये॑ ॥७ ॥

Mantra without Swara
सुनावमा रुहेयमस्रवन्तीमनागसम् । शतारित्राँ स्वस्तये ॥

सुनावमिति सुऽनावम्। आ। रुहेयम्। अस्रवन्तीम्। अनागसम्। शतारित्रामिति शतऽअरित्राम्। स्वस्तये॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (नाविक-नेता म्हणतो) हे मनुष्यांनो, जसे मी (स्वस्तये) माझ्या कल्याणासाठी या (अस्रवन्तीम्‌) छिद्ररहित (वा सर्वथा सुरक्षित) आणि (अनागसम्‌) ज्या निर्माणाच्या दृष्टीने कोणताही दोष नाही, अशा (शतारित्राम्‌) अनेक नांगर आहेत (कर्ण = सुकाणू आदी नौका संचालनाची साधनें आहेत) (सुनावम्‌) सुंदर सुखकर नौकेमधे मी (एक नौ सैनिक वा नेता) बसत आहे, लोकहो, या नौकेत तुम्हीदेखील बसा. ॥7॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. लोकांनी विशाल नौका तयार करून त्यांचे नीट परीक्षण केल्यानंतर, त्यात स्वार व्हावे आणि समुद्रपारच्या देशाला जावे. त्या दूरगामी जलयाना मधे (सुरक्षेची, नांगर आदी भरपूर साधनें असावीत आणि त्या नौका उत्तम स्थितीतील असाव्यात. ॥7॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -