Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 6

61 Mantra
21/6
Devata- अदितिर्देवता Rishi- गयप्लात ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सु॒त्रामा॑णं पृथि॒वीं द्याम॑ने॒हस॑ꣳ सु॒शर्मा॑ण॒मदि॑तिꣳ सु॒प्रणी॑तिम्।दै॒वीं नाव॑ꣳ स्वरि॒त्रामना॑गस॒मस्र॑वन्ती॒मा रु॑हेमा स्व॒स्तये॑॥६॥

सु॒त्रामा॑ण॒मिति॑ सु॒ऽत्रामा॑णम्। पृ॒थि॒वीम्। द्याम्। अ॒ने॒हस॑म्। सु॒शर्म्मा॑ण॒मिति॑ सु॒ऽशर्मा॑णम्। अदि॑तिम्। सु॒प्रणी॑तिम्। सु॒प्रनी॑ति॒मिति॑ सु॒ऽप्रनी॑तिम्। दैवी॑म्। नाव॑म्। स्व॒रि॒त्रामिति॑ सुऽअरि॒त्राम्। अना॑गसम्। अस्र॑वन्तीम्। आ। रु॒हे॒म॒। स्व॒स्तये॑ ॥६ ॥

Mantra without Swara
सुत्रामाणम्पृथिवीन्द्यामनेहसँ सुशर्माणमदितिँ सुप्रणीतिम् । देवीन्नावँ स्वरित्रामनागसमस्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये ॥

सुत्रामाणमिति सुऽत्रामाणम्। पृथिवीम्। द्याम्। अनेहसम्। सुशर्म्माणमिति सुऽशर्माणम्। अदितिम्। सुप्रणीतिम्। सुप्रनीतिमिति सुऽप्रनीतिम्। दैवीम्। नावम्। स्वरित्रामिति सुऽअरित्राम्। अनागसम्। अस्रवन्तीम्। आ। रुहेम। स्वस्तये॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (जलदान तयार करणारे यांत्रिक, कारागीर आदी) शिल्पीजनहो, ज्याप्रमाणे आम्ही (व्यवसायीजन) (स्वस्तये) अधिक सुखप्राप्तीसाठी (सुत्रामाणम्‌) रक्षण करण्याचे मुख्य साधन असलेल्या (पृथिवीम्‌) अत्यंत विशाल आणि (द्याम्‌) ज्यात पुष्कळ उत्तम प्रकाश -व्यवस्था आहे (अशा नावेवर स्वार होतो, तसे तुम्हीही व्हा वा आमच्यासाठी अशा पुष्कळ नौका, विशाल जलयान तयार करा की जी नौका) (अनेहसम्‌) नष्ट-ध्वस्त होऊ शकत नाही, (सुशर्माण्‌) ज्या पुष्कळ कक्ष वा घर आहेत, (अदितिम्‌) जिचे तुकडे होऊ शकत नाहीत जी (सुप्रणीतिम्‌) ज्यामधे राजा आणि प्रजाजन सर्वांच्या सुख सोयीचा विचार केला आहे (सतवरित्राम्‌) ज्यामधे भरपूर फळ्या, दांडे, यांचा वापर केलेला आहे, अशा (अनागसम्‌) कुठेही दोष नसलेल्या आणि (अस्रवन्तीम्‌) छिद्ररहित (दैवीम्‌) दिव्य अथवा विद्वान तंत्रज्ञ, अभियांत्रिकीजन) यांना (याहून श्रेष्ठ नौका तयार करण्याची) प्रेरणा देणाऱ्या या (नावम्‌) नौमेवर आम्ही (आ, रूहेम) स्वार होतो (त्याद्वारे व्यवसाय, व्यापार, उद्योगादी करणे) तसे हे (सामान्य नागरिकहो) तुम्हीदेखील करा टीप (या मंत्रात वर्णन केलेल्या जलयानाचे अगदी आजच्या विशाल बोटी, स्टीमर आदीशी किती साम्य आहे, याचा सूज्ञांनी अवश्य विचार करावा) ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यानो, (या मंत्रात असा उपदेश केला आहे की तुम्ही अशा नौका तयार करा की (ज्यामधे अनेक घर, कक्ष, अनेक साधनें आहेत आपल्या रक्षणाची व्यवस्था असावी, ज्यात विविध प्रकारची प्रकाश-व्यवस्था असेल आणि ज्यात अनेक (जलयान तज्ञ यंत्रज्ञ) विद्वान आहेत. अशा विशाल छिद्ररहित जलयानावर स्वार होऊन समुद्र (द्वीप सरोवर आदी) जलस्थानात स्थित, देश-देशांतर आणि द्वीप-द्वीपांतरापर्यंत जाऊन वा येणे-जाणे करीत भूगोलात विद्यमान देश आणि दीपांचा तुम्ही शोध करावा आणि त्याद्वारे संपत्तिवान व्हावे. ॥6॥
Subject
आता जलयानाविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -