Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 57

61 Mantra
21/57
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- अतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वं ब॒र्हिर्वारि॑तीनामध्व॒रे स्ती॒र्णम॒श्विभ्या॒मूर्णम्रदाः॒ सर॑स्वत्या स्यो॒नमि॑न्द्र ते॒ सदः॑। ई॒शायै॑ म॒न्युꣳ राजा॑नं ब॒र्हिषा॑ दधुरिन्द्रि॒यं व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥५७॥

दे॒वम्। ब॒र्हिः। वारि॑तीना॑म्। अ॒ध्व॒रे। स्ती॒र्णम्। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। ऊर्ण॑म्रदा॒ऽइत्यूर्ण॑ऽम्रदाः। सर॑स्वत्या। स्यो॒नम्। इ॒न्द्र॒। ते॒। सदः॑। ई॒शायै॑। म॒न्युम्। राजा॑नम्। ब॒र्हिषा॑। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥५७ ॥

Mantra without Swara
देवम्बर्हिर्वारितीनामध्वरे स्तीर्णमश्विभ्यामूर्णम्रदाः सरस्वत्या स्योनमिन्द्र ते सदः । ईशायै मन्युँ राजानं बर्हिषा दधुरिन्द्रियँ वसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवम्। बर्हिः। वारितीनाम्। अध्वरे। स्तीर्णम्। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। ऊर्णंम्रदाऽइत्यूर्णंऽम्रदाः। सरस्वत्या। स्योनम्। इन्द्र। ते। सदः। ईशायै। मन्युम्। राजानम्। बर्हिषा। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (इन्द्र) आपल्या इंद्रियांचे स्वामी असलेल्या (इंद्रियजित्‌) हे जीवा, (ते) तुझे (सरस्वत्या) उत्तम वाणीचा प्रयोग करीत (स्योनम्‌) सुख भोगणें आणि (सदः) ज्यांमधे स्वार होतात, त्या नौका आदी यानामधे बसणें (तुला सुखकर होवो) तसेच (ऊर्णम्रदाः) शिल्पकलेतून तयार केलेल्या कलाकृतींना झाकून ठेवणारे (सुरक्षितपणे सांभाळायच्या वस्तूना सांभाळणारे कुशल कलाकार आहेत (ते आपल्या) यत्नात यशस्वी होवोत) तसेच (अश्विभ्याम्‌) वायू आणि विद्युत यांच्याद्वारे (अध्वरे) नष्ट करण्यास अयोग्य (सुरक्षितपणे ठेवायच्या) अशा शिल्पयज्ञात ज्या विद्वानांनी (वारितीनाम्‌) पाण्यावर चालणाऱ्या यानांची (निर्मिती केली आहे, ते यशस्वी होवोत) त्या सर्व पदार्थांद्वारे (यान, वाहन आदीद्वारे) (स्तीर्णम्‌) ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी क्रिया करून (गगनविहार, संचालन, उडणे आदीद्वारे) जे विद्वान मनुष्य समृद्धी प्राप्त करतात (ते सुखी होवोत) तसेच (मन्युम्‌) सर्व पदार्थांच्या गुणदोषांचा आणि त्यांपासून लाभ घेण्याचा विचार करणाऱ्या (राजानम्‌) कीर्तिमान राजाप्रमाणे जे लोक (बर्हिषा) अंतरिक्षात (वसुधेयस्य) पृथ्वी आदी आधारांवर (वसुवने) पृथ्वी आदी लोकांची (आणि त्यावरील जीवांची) सेवा करतात, ते (वैज्ञानिक) (इन्द्रियम्‌) धन (दधुः) प्राप्त करोत. आपल्या इच्छित फळाला (व्यन्तु) प्राप्त करोत. हे विद्वान जीव, तूदेखील त्यांच्याप्रमाणे आपल्या (यज) कार्यांचे संयोजन कर ॥57॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा व वाचकलुप्तोमा अलंकार आहेत. जर माणूस आकाशाप्रमाणे निष्कंप, निर्भय, आनन्दी, एकांत स्थानात राहणारा आला, तसेच त्याच्या आज्ञेचे कधी कोणी भंग करू न शकेल, एवढा पुरुषार्थी झाला, तर या जगामधे तो धनवान का होणार नाही? (अर्थात-पुरूषार्थी माणूस अवश्य श्रीमंत होतो) ॥57॥
Subject
पुन्हा तोच विषय -