Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 56

61 Mantra
21/56
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- निचृदत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
दे॒वो दे॒वैर्वन॒स्पति॒र्हिर॑ण्यपर्णोऽअ॒श्विभ्या॒ सर॑स्वत्या सुपिप्प॒लऽइन्द्रा॑य पच्यते॒ मधु॑। ओजो॒ न जू॒ति॑र्ऋ॑ष॒भो न भामं॒ वन॒स्पति॑र्नो॒ दध॑दिन्द्रि॒याणि॑ वसु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥५६॥

दे॒वः। दे॒वैः। वन॒स्पतिः॑। हिर॑ण्यवर्ण॒ इति॒ हिर॑ण्यऽवर्णः। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। सर॑स्वत्या। सु॒पि॒प्प॒ल इति॑ सुऽपिप्प॒लः। इन्द्रा॑य। प॒च्य॒ते॒। मधु॑। ओजः॑। न। जू॒तिः। ऋ॒ष॒भः। न। भाम॑म्। वन॒स्पतिः॑। नः॒। दध॑त्। इ॒न्द्रि॒याणि॑। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥५६ ॥

Mantra without Swara
देवो देवैर्वनस्पतिर्हिरण्यपर्णाऽअश्विभ्याँ सरस्वत्या सुपिप्पलऽइन्द्राय पच्यते मधु । ओजो न जूतिरृषभो न भामँवनस्पतिर्ना दधदिन्द्रियाणि वसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवः। देवैः। वनस्पतिः। हिरण्यवर्ण इति हिरण्यऽवर्णः। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। सरस्वत्या। सुपिप्पल इति सुऽपिप्पलः। इन्द्राय। पच्यते। मधु। ओजः। न। जूतिः। ऋषभः। न। भामम्। वनस्पतिः। नः। दधत्। इन्द्रियाणि। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, जसे (अश्विभ्याम्‌) जल आणि विद्युतरूपाने व्याप्त अग्नीच्या रूपाने (देवैः) आणि आपल्या प्रकाश देणाऱ्या गुणांमुळे (देवः) प्रकाशमान झालेला (हिरण्यपर्णः) तेजःस्वरूप (वनस्पितिः) किरणांद्वारा वनाचे रक्षण करणारा सूर्य (सर्व प्राण्यांसाठी सुखकारक आहे) तसेच (सरस्वत्या) वृद्धिंगत (वा वाढत जाणाऱ्या स्वभावामुळे) (सुपिप्पलः) सुंदर फळें धारण करणारे पिंपळ आदी वृक्ष (इन्द्राय) प्राण्यांसाठी (वा आणिमात्रासाठी (मधु) गोड फळें (पच्यते) पिकवितात (तसे सर्वांना ही फळें वा लाभ मिळावेत) (जुतिः) वेग (न) जसा (ओजः) पाण्यात आहे अथवा (न) जसा (भामम्‌) क्रोध (ऋषभः) बलवान प्राण्याला ओढून नेतो, तसे (वनस्पतिः) वट आदी वृक्ष (वसुधेयस्य) सर्वाधार या संसारामधे (नः) आम्हा लोकांसाठी आणि (वसुवने) धनत्वी कामना करणाऱ्या लोकांसाठी (इन्द्रियाणि विविध फळे (वा लाभ) (दधत्‌) धारण करतात. (वृक्ष, फळें, फूल, लाकूड आदी रूपाने मानवाची सेवा करतात) ते वरील सर्व पदार्थ सर्वांना (व्यन्तु) प्राप्त व्हावेत. त्यांच्याप्रमाणे हे विद्वान, तुम्हीदेखील आपल्या सर्व व्यवहारात संगती ठेवत जा. ॥56॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. (ईश्वर आदेश देत आहे) हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे सूर्य वृष्टीद्वारे आणि नदी जलाद्वारे वृक्षांची नीट रक्षा करते (पालन करते, वाढविते) आणि त्याद्वारे मधुर फळें सर्वांना उपलब्ध करून देते, तद्वत तुम्ही देखील सर्वांसाठी आवश्यक ते सर्व पदार्थ उत्पन्न करा. तसेच ज्याप्रमाणे एक धार्मिक राजा दुर्जनांवर क्रोध आणि त्यांच्याविषयी अप्रीती करतो (दंड आदी देतो) तसे हे मनुष्यांनो, तुम्ही दुष्टांविषयी अप्रीती आणि सज्जनां विषयी प्रीतीभाव ठेवा. ॥56॥
Subject
मनुष्यांनी कसे वागावे, याविषयी -