Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 54

61 Mantra
21/54
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
दे॒वीस्ति॒स्रस्ति॒स्रो दे॒वीर॒श्विनेडा॒ सर॑स्वती। शूषं॒ न मध्ये॒ नाभ्या॒मिन्द्रा॑य दधुरिन्द्रि॒यं व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥५४॥

दे॒वीः। ति॒स्रः। ति॒स्रः। दे॒वीः। अ॒श्विना॑। इडा॑। सर॑स्वती। शूष॑म्। न। मध्ये॑। नाभ्या॑म्। इन्द्रा॑य। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥५४ ॥

Mantra without Swara
देवीस्तिस्रस्तिस्रो देवीरश्विनेडा सरस्वती । शूषन्न मध्ये नाभ्यामिन्द्राय दधुरिन्द्रियँवसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवीः। तिस्रः। तिस्रः। देवीः। अश्विना। इडा। सरस्वती। शूषम्। न। मध्ये। नाभ्याम्। इन्द्राय। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यार्थी, ज्यप्रमाणे (तिस्रः) जन्म देणारी, अध्यापन करणारी आणि उपदेश करणारी, या तीन (देवीः) सदैव विद्येमुळे दीप्तिमान असलेल्या स्त्रिया (वसुधेयस्य) ज्यामधे धनधारण केले पाहिजे, (जिथे जगण्यासाठी धन आवश्यक आहे) अशा जगा (मध्ये) मधे (वसुवने) उत्तम धनाची कामना करणाऱ्या (इन्द्राय) जीवासाठी (जन्म, विद्या आणि ज्ञान देऊन त्याला उपकृत करतात) आणि (तिस्रः) उत्तम, मध्यम, निकृष्ट अशा (देवीः) प्राप्त विद्येमुळे प्रकाशमान झालेल्या तीन कन्यांना (दधुः) धारण करतात (विद्यार्थीनींच्या ग्रहणक्षमतेप्रमाणे त्यांना उत्तम, मध्यम कनिष्ठ ज्ञान देऊन त्यांना विद्वान करतात) आणि (अश्विना) अध्यापक व उपदेशक लोक (इडा) स्तुती करणारी स्त्री आणि (सरस्वती) विज्ञानवती विदुषी स्त्री (इन्द्रियम्‌) मनाला नियंत्रित, एकाग्र करते (का प्रकारे?) जसे (नाभ्याम्‌) नाभीमधे (शूषम्‌) सर्व शरीराचे बळ सामावलेले असते, (त्याप्रमाणे अध्यापक, उपदेशक, विदुषी स्त्री मनात सर्व क्रिया एकवटून घेतात) या सर्वांनी जसे वरील पदार्थ (व्यन्तु) प्राप्त करावेत, तसे, हे विद्यार्थी, तू पण (यज) आपले सर्व व्यवहार नियमित व नियंत्रित करीत जा ॥54॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. ज्याप्रमाणे जन्मदात्री माता, अध्यापन करणारी आणि उपदेश देणारी या तीन पंडिता स्त्रिया, कुमारिका कन्यांना शिक्षणाद्वारे पंडिता करून त्यांना सुखी करतात, तसे पिता, अध्यापक आणि उपदेशक या तीन विद्वानांनी कुमार विद्यार्थ्यांना विद्वान करून सभ्य, सदाचारी केले पाहिजे ॥54॥
Subject
मात-पित्यांनी आपल्या संतानाचे (चारित्र्य व आचार) कसे निर्माण करावे, याविषयी -