Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 50

61 Mantra
21/50
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
दे॒वीऽउ॒षासा॑व॒श्विना॑ सु॒त्रामेन्द्रे॒ सर॑स्वती।बलं॒ न वाच॑मा॒स्यऽउ॒षाभ्यां॑ दधुरिन्द्रि॒यं व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥५०॥

दे॒वीऽइति॑ दे॒वी। उ॒षासौ॑। उषसा॒वित्यु॒षसौ॑। अ॒श्विना॑। सु॒त्रामेति॑ सु॒ऽत्रामा॑। इन्द्रे॑। सर॑स्वती। बल॑म्। न। वाच॑म्। आ॒स्ये᳖। उ॒षाभ्या॑म्। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥५० ॥

Mantra without Swara
देवीऽउषासावश्विना सुत्रामेन्द्रे सरस्वती । बलन्न वाचमास्य उषाभ्यान्दधुरिन्द्रियँवसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवीऽइति देवी। उषासौ। उषसावित्युषसौ। अश्विना। सुत्रामेति सुऽत्रामा। इन्द्रे। सरस्वती। बलम्। न। वाचम्। आस्ये। उषाभ्याम्। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥५०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान्‌, ज्याप्रमाणे (देवीः) निरंतर प्रकाशित असणाऱ्या (उषासौ) सायंकाळ आणि प्रातःकाळाच्या दोन वेळा तसेच (सुत्रामा) उत्तमप्रकारे रक्षा करणारे (सैनिक वा राजपुरूष) आणि (सरस्वती) विशेष ज्ञानवती स्त्री आणि (अश्विना) सूर्य-चंद्र हे दोघे (वसुवने) धन-प्राप्ती व धनोपभोग करणाऱ्या मनुष्यासाठी (वसुधेयस्य) (असे कर्म वा व्यवहार करण्यास प्रवृत्त करतात की) त्यामुळे धन-संपदा मिळते. (धन प्राप्तीसाठी इच्छुक व्यक्ती सायंकाळी, सकाळी, सूर्य-चंद्राच्या प्रकाशात दिवसा-रात्री यत्न करत विदुषी स्त्रियांचे मार्गदर्शन घेतात व राजपुरुषांचे रक्षण मिळवतात) (तसे तूही यत्न कर) (इन्द्रे) श्रेष्ठ ऐश्वर्य मिळाल्या नंतर (न) ज्याप्रमाणे (बलम्‌) शक्ती तसेच (आस्ये) मुखात (याचम्‌) उत्तम वाणी (यावी) त्याप्रमाणे (उषाभ्याम्‌) सायंकाळी व प्रातःकाळी (इन्द्रियम्‌) धनाला धारण करावे (अर्जनासाठी यत्न करावेत, आणि त्यामुळे सर्वांना तो धन (व्यन्तु) प्राप्त व्हावे. (वा होते) हे विद्वान, आपणदेखील त्याप्रमाणे आपले व्यवहार वा कर्म नियमित करा. ॥50॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र सकाळी व संध्याकाळी निश्चित नियमांप्रमाणे सर्वांच्या कल्याणासाठी यत्न करतात (प्रकाश, उष्णता व प्रेरणा देतात) त्याप्रमाणे जे लोक सायंकाळी वा प्रातःकाळी निद्रा आणि आलस्य आदीचा त्याग करून ईश्वराचे ध्यान धरतात, ते प्रभूत धनाची प्राप्ती करण्यात यशस्वी होतात ॥50॥
Subject
मनुष्यांनी कसे वागावे, याविषयी -