Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 5

61 Mantra
21/5
Devata- आदित्या देवताः Rishi- वामदेव ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
म॒हीमू॒ षु मा॒तर॑ꣳ सुव्र॒ताना॑मृ॒तस्य॒ पत्नी॒मव॑से हुवेम।तु॒वि॒क्ष॒त्राम॒जर॑न्तीमुरू॒ची सु॒शर्मा॑ण॒मदितिꣳ सु॒प्रणी॑तिम्॥५॥

म॒हीम्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सु। मा॒तर॑म्। सु॒व्र॒ताना॑म्। ऋ॒तस्य॑। पत्नी॑म्। अव॑से। हु॒वे॒म॒। तु॒वि॒क्ष॒त्रामिति॑ तुविऽक्ष॒त्राम्। अ॒जर॑न्तीम्। उ॒रू॒चीम्। सु॒शर्मा॑ण॒मिति॑ सु॒ऽशर्मा॑णम्। अदि॑तिम्। सु॒प्रणी॑तिम्। सु॒प्रनी॑ति॒मिति॑ सु॒ऽप्रनी॑तिम् ॥५ ॥

Mantra without Swara
महीमू षु मातरँ सुव्रतानामृतस्य पत्नीमवसे हुवेम । तुविक्षत्रामजरन्तीमुरूचीँ सुशर्माणमदितिँ सुप्रणीतिम् ॥

महीम्। ऊँऽइत्यूँ। सु। मातरम्। सुव्रतानाम्। ऋतस्य। पत्नीम्। अवसे। हुवेम। तुविक्षत्रामिति तुविऽक्षत्राम्। अजरन्तीम्। उरूचीम्। सुशर्माणमिति सुऽशर्माणम्। अदितिम्। सुप्रणीतिम्। सुप्रनीतिमिति सुऽप्रनीतिम्॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे आम्ही (कृषक, यांत्रिकजन, वैश्य आदी व्यसायी लोक) या (मातरम्‌) आईप्रमाणे असलेल्या या (भूमातेला मान देतो व तिच्यापासून लाभ घेतो, तसे सर्वांनी करावे कारण की ही भूमी) सुव्रतानाम्‌) सत्य आचरण करणाऱ्या आम्हा (व्यवसायी लोकांसाठी) (ऋतस्य) सत्य नियमांप्रमाणे (पत्नीम्‌) चालणारी म्हणजे सत्यव्रती स्त्री प्रमाणे आहे. आम्ही अशा त्या (तुविक्षत्राम्‌) अत्यंत संपत्तिशाली (जिच्या गर्भात धातू, रत्नादी विद्यमान आहेत) अशा (अजरन्तीम्‌) जी जीर्ण होत नाही (फक्त तिच्या द्रव्यादीचे रूप बदलते) आणि (उरूचीम्‌) विविध पदार्थ देणारी (सुशर्माणम्‌) जिच्या क्षेत्रावर उत्तम घरें बांधता येतात, अशी आणि (सुप्रणीतिम्‌) उत्तम नीति नियमांप्रमाणे वागणारी (उ) उत्तम (अदितिम्‌) अखंडित अशा (महीम्‌) या पृथ्वीचा आम्ही (कृषक, व्यवसायी आदी लोक) (अवसे) आपल्या रक्षणासाठी (प्रगती व वृद्धीसाठी) (सु, हुवेम) स्वीकार करतो (लाभ घेतो) त्याप्रमाणे, इतर सर्व लोकहो, तुम्हीही त्या पृथ्वीचा स्वीकार करा (भूमातेकडुन पुष्कळ लाभ घ्या.) ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जशी एक माता आपल्या मुलाबाळांचे आणि एक पतिव्रता पत्नी आपल्या पतीचे पालन करते, तद्वत ही पृथ्वी (माता) सर्वांचे (प्राणिमात्राचे) पालन करते ॥5॥
Subject
आता पृथ्वी विषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -