Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 49

61 Mantra
21/49
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- ब्राह्म्युष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
दे॒वीर्द्वारो॑ऽअ॒श्विना॑ भि॒षजेन्द्रे॒ सर॑स्वती।प्रा॒णं न वी॒र्य्यं न॒सि द्वारो॑ दधुरिन्द्रि॒यं व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥४९॥

दे॒वीः। द्वारः॑। अ॒श्विना॑। भि॒षजा॑। इन्द्रे॑। सर॑स्वती। प्रा॒णम्। न। वी॒र्य्य᳖म्। न॒सि। द्वारः॑। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥४९ ॥

Mantra without Swara
देवीर्द्वारोऽअश्विना भिषजेन्द्रे सरस्वती । प्राणन्न वीर्यन्नसि द्वारो दधुरिन्द्रियँवसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवीः। द्वारः। अश्विना। भिषजा। इन्द्रे। सरस्वती। प्राणम्। न। वीर्य्यम्। नसि। द्वारः। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, ज्याप्रमाणे (अश्विना) पवन आणि सूर्य तसेच (सरस्वती) विशेष ज्ञानवती स्त्री आणि (भिषजा) वैद्य (इन्द्रे) ऐवर्य प्राप्ती करिता (देवीः) अत्यंत दीप्तीमान घराच्या (द्वारः) घरातून बाहेर जातांना आणि प्रवेश करतांना सुशोभित अलंकृत द्वारातून (जातात, येतात) (पवन आणि सूर्य, घरात प्रकाश व शुद्धी देण्यासठी घराबाहेर जातात येतात, तशाप्रकारे हे विद्वान, तूही आचरण कर) याशिवाय ज्याप्रमाणे (प्राणम्‌) श्वास (नसि) नासिकेत जाते-येते (न) त्याप्रमाणे विद्वान (वीर्य्यम्‌) शक्ती धारण करतात आणि (द्वारः) शरीराच्या द्वारांना म्हणजे नव छिद्ररूप द्वारांना (दधुः) धारण करतात, (प्राण, अपानादीद्वारे नव द्वारांवर नियंत्रण ठेवतात) (तसे तूही कर) तसेच (वसुवने) धनाचा उपयोग घेण्यासाठी (वसुधेयस्य) कोषातील (इन्द्रियम्‌) धन विद्वज्जन (व्यन्तु) प्राप्त करतात (योग्य त्या कार्यासाठीच कोषातून धन काढतात) त्याप्रमाणे हे विद्वान, तुदेखील आपल्या सर्व व्यवहारांना नियंत्रित वा संयमित कर ॥49॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा व वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. जसा सूर्य-चंद्राचा प्रकाश घराच्या द्वारात कानांत प्रविष्ट होऊन अंतर्मनाला प्रकाशित करतो. तसेच जे लोक योग्य पद्धतीने विद्येचा उपयोग करतात, ते धनवान होतात. ॥49॥
Subject
विद्वानांचा उपदेश कसा (कशाप्रकारे हितकर) असतो, याविषयी -