Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 48

61 Mantra
21/48
Devata- सरस्वत्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
दे॒वं ब॒र्हिः सर॑स्वती सुदे॒वमिन्द्रे॑ऽअ॒श्विना॑।तेजो॒ न चक्षु॑र॒क्ष्योर्ब॒र्हिषा॑ दधुरिन्द्रि॒यं वसु॒॑वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥४८॥

दे॒वम्। ब॒र्हिः। सर॑स्वती। सु॒दे॒वमिति॑ सुऽदे॒वम्। इन्द्रे॑। अ॒श्विना॑। तेजः॑। न। चक्षुः॑। अ॒क्ष्योः᳖। ब॒र्हिषा॑। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥४८ ॥

Mantra without Swara
देवम्बर्हिः सरस्वती सुदेवमिन्द्रे अश्विना । तेजो न चक्षुरक्ष्योर्बर्हिषा दधुरिन्द्रियँवसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥

देवम्। बर्हिः। सरस्वती। सुदेवमिति सुऽदेवम्। इन्द्रे। अश्विना। तेजः। न। चक्षुः। अक्ष्योः। बर्हिषा। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥४८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (सरस्वती) एक प्रशंसनीया विज्ञानवती स्त्री (इन्दद्र) परम ऐवर्य प्राप्त करण्यासाठी (देवम्‌) दिव्य (सुदेवम्‌) गुणवान विद्वान पतीची (कामना करते) (ती कामना कशी असते?) (बर्हिः) अंतरिक्ष (अश्विना) अध्यापक आणि उपदेशक तसेच (चक्षुः) नेत्राचे (तेजः) (न) तेज (यांच्यासारखी तीव्र आणि वांछनीय असते) याशिवाय ज्याप्रमाणे विद्वज्जन (वसुधेयस्य) धनप्राप्ती करण्यासाठी (अक्ष्योः) डोळ्यांनी (बर्हिषा) अंतरिक्षात वा अवकाशात पाडून (म्हणजे नीट) प्रामाणिकपणे परीक्षा करून (ते धन कपट, द्वेषादीद्वारे कमावलेले तर नाही ना, हे नीट पाहून (दधुः) ते धन धारण करतात आणि (व्यन्तु) ते प्राप्त करून (दुर्व्यवहारात व्यय न करता) सांभाळून ठेवतात. हे विद्वान, आपणही या (नैतिक वा शुद्ध) मार्गाने धन अर्जित करा आणि व्यय करा. ॥48॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा हे दोन अलंकार आहेत. हे मनुष्यांनो, जसे एक विदुषी ब्रह्मचारिणी कुमारी कन्या मनोहर विद्वान पतीला प्राप्त करून (अनुकूल व मनासारखा पती मिळाल्यावर) प्रसन्न होते, तसे विद्या प्राप्त करून आणि भौतिक आवश्यक पदार्थ प्राप्त करून तुम्ही सर्व जणांनी आनंदित व्हायला पाहिजे. ॥48॥
Subject
आता विद्वानांनी कसे वागावे, या विषयी -