Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 43

61 Mantra
21/43
Devata- होत्रादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- आद्यस्य याजुषी पङ्क्तिः, कृति Swara- पञ्चमः, षड्जः
Mantra with Swara
होता॑ यक्षद॒श्विनौ॒ छाग॑स्य ह॒विष॒ऽआत्ता॑म॒द्य म॑ध्य॒तो मेद॒ऽउद्भृ॑तं पु॒रा द्वेषो॑भ्यः पु॒रा पौरु॑षेय्या गृ॒भो घस्तां॑ नू॒नं घा॒सेऽअ॑ज्राणां॒ यव॑सप्रथमाना सु॒मत्क्ष॑राणा शतरु॒द्रिया॑णामग्निष्वा॒त्तानां॒ पीवो॑पवसनानां पार्श्व॒तः श्रो॑णि॒तः शि॑ताम॒तऽउ॑त्साद॒तोऽङ्गा॑दङ्गा॒दव॑त्तानां॒ कर॑तऽए॒वाश्विना॑ जु॒षेता॑ ह॒विर्होत॒र्यज॑॥४३॥

हो॒ता। य॒क्ष॒त्। अ॒श्विनौ॑। छाग॑स्य। ह॒विषः॑। आत्ता॑म्। अ॒द्य। म॒ध्य॒तः। मेदः॑। उद्भृ॑त॒मित्युत्ऽभृ॑तम्। पु॒रा। द्वेषो॑भ्य॒ इति॒ द्वेषः॑ऽभ्यः। पु॒रा। पौरु॑षेय्याः। गृ॒भः। घस्ता॑म्। नू॒नम्। घा॒सेऽअ॑ज्राणा॒मिति॑ घा॒सेऽअ॑ज्राणाम्। यव॑सप्रथमाना॒मिति॒ यव॑सऽप्रथमानाम्। सु॒मत्क्ष॑राणा॒मिति॑ सु॒मत्ऽक्ष॑राणाम्। श॒त॒रु॒द्रिया॑णा॒मिति॑ शतऽरु॒द्रिया॑णाम्। अ॒ग्नि॒ष्वा॒त्ताना॑म्। अ॒ग्नि॒स्वा॒त्ताना॒मित्य॑ग्निऽस्वा॒त्ताना॑म्। पीवो॑पवसनाना॒मिति॒ पीवः॑ऽउपवसनानाम्। पा॒र्श्व॒तः श्रो॒णि॒तः। शि॒ता॒म॒तः। उ॒त्सा॒द॒त इत्यु॑त्ऽसाद॒तः। अङ्गा॑दङ्गा॒दित्यङ्गा॑त्ऽअङ्गात्। अव॑त्तानाम्। कर॑तः। एव। अ॒श्विना॑। जु॒षेता॑म्। ह॒विः। होतः॑। यज॑ ॥४३ ॥

Mantra without Swara
होता यक्षदश्विनौ च्छागस्य हविषऽआत्तामद्य मध्यतो मेदऽउद्भृतम्पुरा द्वेषोभ्यः पुरा पौरुषेय्या गृभो घस्तान्नूनङ्घासेअज्राणाँयवसप्रथमानाँ सुमत्क्षराणाँ शतरुद्रियाणामग्निष्वात्तानाम्पीवोपवसानाम्पार्श्वतः श्रोणितः शितामतऽउत्सादतोङ्गाद्ङ्गादवत्तानाम्करत एवाश्विना जुषेताँ हविर्हातर्यज ॥

होता। यक्षत्। अश्विनौ। छागस्य। हविषः। आत्ताम्। अद्य। मध्यतः। मेदः। उद्भृतमित्युत्ऽभृतम्। पुरा। द्वेषोभ्य इति द्वेषःऽभ्यः। पुरा। पौरुषेय्याः। गृभः। घस्ताम्। नूनम्। घासेऽअज्राणामिति घासेऽअज्राणाम्। यवसप्रथमानामिति यवसऽप्रथमानाम्। सुमत्क्षराणामिति सुमत्ऽक्षराणाम्। शतरुद्रियाणामिति शतऽरुद्रियाणाम्। अग्निष्वात्तानाम्। अग्निस्वात्तानामित्यग्निऽस्वात्तानाम्। पीवोपवसनानामिति पीवःऽउपवसनानाम्। पार्श्वतः श्रोणितः। शितामतः। उत्सादत इत्युत्ऽसादतः। अङ्गादङ्गादित्यङ्गात्ऽअङ्गात्। अवत्तानाम्। करतः। एव। अश्विना। जुषेताम्। हविः। होतः। यज॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) (ज्ञान वा धनाचे) दान देणाऱ्या मनुष्या, ज्याप्रमाणे एक (होता) (ज्ञान वा धन) ग्रहण करणारा (जिज्ञासू) मनुष्य (अश्विनौ) अध्यापन आणि उपदेश देणाऱ्या मनुष्यांची (यक्षत्‌) संगती करतो (त्यांच्याकडे जातो) तसेच (अद्य) आज (छागस्य) बकरा आदी पशूं (मध्यतः) पासून (हविषः) हवि देण्यास अथवा उपभोग करण्यासाठी योग्य अशा (मेदः) चिकट वा स्निग्ध भाग म्हणजे तूप आणि दूध आदी पदार्थ (उद्भृतम्‌) काढून (आत्ताम्‌) प्रपात करतात (वा सेवन करतात) (तद्वत्‌ हे याज्ञिक वा दाता मनुष्या, तूदेखील देत जा व सेवन करीत जा) तसेच (द्वेषोभ्यः) दुष्ट वा स्वार्थी मनुष्यांनी (त्या पदार्थांचे सेवन करावे, त्या) (पुरा) आधीच (गृभः) ग्रहण वा सेवन करण्यास योग्य त्या तूप, दूध आदी पदार्थांचे (पौरुषेय्याः) पुरुषसमूहात श्रेष्ठ अशा स्त्रीच्या (पुरा) आधी (नूनम्‌) अवश्यमेव (घस्ताम्‌) सर्वांनी सेवन करावे (नंतर त्या श्रेष्ठ स्त्रीने सेवन करावे) (कुशल वैद्यांनी अशा सर्व लोकांच्या शरिरातील अंगांचे दोष दूर करावेत की) ज्यांचे (यवसप्रथमानाम्‌) यव वा सातू हे प्रथम अन्न आहे (अर्थात जे पथ्याहार करतात) (घासे अज्राणाम्‌) भोजनाच्या आधी जे विशिष्ट (भूक वाढविणारे रस वा पदार्थ) सेवन करतात, तसेच (सुमत्क्षराणाम्‌) ज्यांचे चालणे सुंदर व मोहक आहे (अशा स्वस्थ पुष्ट शरिराच्या माणसांच्या आणि (शतरुद्रियाणाम्‌) दुष्टांना रडविणारे असे शेकडो रूद्र (वीर सैनिक वा सेनापती) ज्यांचे रक्षक आहेत (त्या दुर्बळ जनांच्या) (शरीराच्या आणि शरीरावयवांचे कार्य वैद्यांनी उत्तम ठेवावे) तसेच (पीवोपवसानानाम्‌) जे जाड पांघरूण (वा लोकरीची वस्त्रें नेसतात, पांघरतात, अशा लोकांच्या) वा (अग्निष्वात्तानाम्‌) ज्यांनी अग्निविद्येचे उत्तम ज्ञान प्राप्त केले आहे अशा (वैज्ञानिकांच्या व ऊर्जा, यज्ञक्रिया जाणणाऱ्यांच्या) अशा वर्णित सर्व प्राण्यांच्या (पार्श्वतः) पाठीमागील (भागांच्या) अथवा (श्रोणितः) कटिप्रदेशातील आणि (शितामतः) ज्या अंगांमधे दाहक अथवा अपरिपक्व अन्न थांबले आहे, (अशा पचनसंस्थांच्या) भागांतील (उत्सादतः) दोष शोधून काढून (वैद्यांनी निपटून काढावेत) वरील लोकांच्या (अङ्गादङ्गात्‌) प्रत्येक अंगाचे कार्य व्यवस्थित ठेवावे अथवा (अवत्तानाम्‌) बलवान कार्यक्षम अवयवांना (एव) मात्र (अश्विना) वैद्यांनी (एव) अवश्यमेव सुस्थितीत (करतः) ठेवावे (जर शरीर आणि शारीरिक) अवयवांतील दोष वा रोग दूर करता येत नसतील, तर किमान वैद्यांनी शरिरातील कार्यक्षम अवयवांचे रक्षण करावे. चुकीची औषधे देऊन अंगांची हानी करू नये) तसेच वरील सर्व लोकांनी (हविः) खाण्यास योग्य अशा पदार्थांचे (जुषन्ताम्‌) सेवन करावे. (हे याज्ञिक पुरूषा) तूही त्यांच्या प्रमाणे (यज) उक्त पदार्थांचा संग्रह करीत जा. त्यांच्याप्रमाणे व्यवहार औषधीसेवनादी तसेच त्यांचा संग करीत जा. ॥43॥
Essence
भावार्थ - जे लोक शेळी आदी पशूंचे पालन-रक्षण करून त्यांच्या दूध आदी पदार्थांवर चांगले संस्कार (शुद्धी व निवड करून) सेवन करतात, त्याचबरोबर वैर बाळगणाऱ्या स्वार्थी दुष्ट पुरूषांचे दमन करून वा त्यांना दूर ठेऊन निष्णात वैद्यांचा मात्र संग करतात, आणि खाणे, पांघरणे, नेसणे आदी कार्यें उत्तम पणे करतात, त्यांच्या प्रत्येक अंगातील रोग नाश पावतात व ती माणसें सदा सुखी राहतात. ॥43॥
Subject
पुनश्च, तोच विषय पुढील मंत्रात -