Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 39

61 Mantra
21/39
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- निचृदत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
होता॑ यक्ष॒द् वन॒स्पति॑ꣳ शमि॒तार॑ꣳ श॒तक्र॑तुं भी॒मं न म॒न्युꣳ राजा॑नं व्या॒घ्रं नम॑सा॒श्विना॒ भाम॒ꣳ सर॑स्वती भि॒षगिन्द्रा॑य दुहऽइन्द्रि॒यं पयः॒ सोमः॑ परि॒स्रुता॑ घृ॒तं मधु व्यन्त्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥३९॥

होता॑। य॒क्ष॒त्। वन॒स्पति॑म्। श॒मि॒तार॑म्। श॒तक्र॑तु॒मिति॑ श॒तऽक्र॑तुम्। भी॒मम्। न। म॒न्युम्। राजा॑नाम्। व्या॒घ्रम्। नम॑सा। अ॒श्विना। भाम॑म्। सर॑स्वती। भि॒षक्। इन्द्रा॑य। दु॒हे॒। इ॒न्द्रि॒यम्। पयः॑। सोमः॑। प॒रि॒स्रुतेति॑ परि॒ऽस्रुता॑। घृ॒तम्। मधु॑। व्यन्तु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥३९ ॥

Mantra without Swara
होता यक्षद्वनस्पतिँ शमितारँ शतक्रतुम्भीमन्न मन्युँ राजानँ व्याघ्रन्नमसाश्विना भामँ सरस्वती भिषगिन्द्राय दुहऽइन्द्रियं पयः सोमः परिस्रुता घृतम्मधु व्यन्त्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। वनस्पतिम्। शमितारम्। शतक्रतुमिति शतऽक्रतुम्। भीमम्। न। मन्युम्। राजानाम्। व्याघ्रम्। नमसा। अश्विना। भामम्। सरस्वती। भिषक्। इन्द्राय। दुहे। इन्द्रियम्। पयः। सोमः। परिस्रुतेति परिऽस्रुता। घृतम्। मधु। व्यन्तु। आज्यस्य। होतः। यज॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) ग्रहण करणाऱ्या (शिकण्याची इच्छा असणाऱ्या) मनुष्या, जसे एक (भिषक्‌) वैद्य अथवा एक (होता) ग्रहण करणारा (चांगले ते स्वीकारणारा माणूस) (इन्द्राय) धनप्राप्तीसाठी (वनस्पतिम्‌) किरणांचा पालक असलेल्या (सूर्याला) आणि (शमितारम्‌) शांती देणाऱ्या (शतक्रतुम्‌) अत्यंत कौशल्याने कर्म करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त करतो (वा त्याच्यापासून लाभ घेतो, तसे तूही कर) जसे कोणी प्राणी (भीमम्‌) (न) भयंकर वस्तू वा प्राण्याप्रमाणे (मन्युम्‌) क्रोधाला अथवा (नमसा) वज्राद्वारे जसे (व्याघ्रम्‌) वाघाला अथवा (राजानम्‌) देदीप्यमान कीर्तीमान राजाला कोणी (यक्षत्‌) प्राप्त करतो (शत्रूला भयभीत करणारा क्रोध हितकारी असतो, वज्र वाघाचा विनाश करतो आणि कोणी संकट ग्रस्त माणूस राजाच्या आश्रयाकडे धावतो, तसे तुम्हीही करा) तसेच जसे (सरस्वती) एक विज्ञानवती स्त्री आणि (अश्विना) सभापती व सेनापती यांच्या (भामम्‌) क्रोधाला (दुहे) प्राप्त करतात (योग्यवेळी) शत्रूवर वा अन्यायी व्यक्तीवर क्रोध करतात, तसे तुम्हीही (परिस्रुता) पुरूषार्थाद्वारे प्राप्त केलेल्या (इन्द्रियम्‌) धन, (पयः) विवधि रस (सोमः) चंद्र (शीतल गुणवती औषधी) (घृतम्‌) घृत (मधु) मध (व्यन्तु) या सर्व पदार्थाचा (उपभोग घ्या) अथवा (हे सर्व पदार्थ एकत्रित करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहा) आणि (आजस्य) तुपाचा (यज) होम कर ॥39॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. जी माणसें विद्या (विज्ञानाद्वारे) अग्नी प्राप्त करतात (अग्नीच्या गुणांचा शोध करून त्यापासून लाभ घेतात) शान्ती आणि चिकाटी धरून विद्वानांकडे जातात, बुद्धिपूर्वक पुरूषार्थ करतात आणि न्यायाने राज्य मिळवितात (वा करतात) तो आपले ऐश्वर्य वाढविण्यात यशस्वी होतात. शिवाय या जन्मीं आणि पुढील जन्मीं सुखी, आनंदी राहतात. ॥39॥
Subject
पुनश्च, त्याच विषयी -