Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 36

61 Mantra
21/36
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- निचृदष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
होता॑ यक्ष॒द् दैव्या॒ होता॑रा भि॒षजा॒श्विनेन्द्रं॒ न जागृ॑वि॒ दिवा॒ नक्तं॒ न भे॑ष॒जैः शूष॒ꣳ सर॑स्वती भि॒षक् सीसे॑न दु॒हऽइन्द्रि॒यं पयः॒ सोमः॑ परि॒स्रुता॑ घृ॒तं मधु॒ व्यन्त्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥३६॥

होता॑। य॒क्ष॒त्। दैव्या॑। होता॑रा। भि॒षजा॑। अ॒श्विना॑। इन्द्र॑म्। न। जागृ॑वि। दिवा॑। नक्त॑म्। न। भे॒ष॒जैः। शूष॑म्। सर॑स्वती। भि॒षक्। सीसे॑न। दु॒हे॒। इ॒न्द्रि॒यम्। पयः॑। सोमः॑। प॒रि॒स्रुतेति॑ परि॒ऽस्रुता॑। घृ॒तम्। मधु॑। व्यन्तु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥३६ ॥

Mantra without Swara
होता यक्षद्दैव्या होतारा भिषजाश्विनेन्द्रन्न जागृवि दिवा नक्तन्न भेषजैः शूषँ सरस्वती भिषक्सीसेन दुह इन्द्रियम्पयः सोमः परिस्रुता घृतम्मधु व्यन्त्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। दैव्या। होतारा। भिषजा। अश्विना। इन्द्रम्। न। जागृवि। दिवा। नक्तम्। न। भेषजैः। शूषम्। सरस्वती। भिषक्। सीसेन। दुहे। इन्द्रियम्। पयः। सोमः। परिस्रुतेति परिऽस्रुता। घृतम्। मधु। व्यन्तु। आज्यस्य। होतः। यज॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) दान देणाऱ्या (दानवृत्ती असणाऱ्या मनुष्या, ज्याप्रमाणे (होता) एक ग्रहण करणारा (उत्तम तेच स्वीकारणारा मनुष्य) (दैव्या) दिव्य गुण प्राप्त करून (होतारा) ग्रहण करणाऱ्या आषि (भिषजा) वैद्याप्रमाणे रोगनिवारण करणाऱ्या (अश्विना) अग्नी आणि वायूचा (इन्द्रम्‌) (न) विद्युतेप्रमाणे (यक्षत्‌) संयोग करतो (पदार्थांचा योग्य उपयोग जाणून घेऊन कोणी उपकारी माणूस अग्नी, वायू आणि विद्युत यांचा साहाय्याने जगाचा उपकार करतो) (तद्वत हे दाता, तूही करीत जा) अथवा ज्याप्रमाणे (जागृवि) एक सजग वा आपल्या कार्यामधे सदैव सावध राहणारी (सरस्वती) वैद्यकशास्त्रात उत्तम ज्ञान असणारी एक मधुरभाषिणी स्त्री (दिवा) दिवसा आणि (नक्तम्‌) रात्री (भिषक्‌) वैद्याच्या (सहकार्याने) (भेषजैः) जलाद्वारे आणि (सीसेन) विशेष प्रकारच्या धनुष्याच्या (यंत्र वा हाताच्या माध्यमातून) (शूषम्‌) शक्ती देणारे (औषध) आणि (इन्द्रियम्‌) धन (दुहे) उत्पन्न करते वा निर्माण करते (त्याप्रमाणे हे दाता यजमान, तूही कर) तसेच जो कोणी (वैद्य) (परिस्रुता) सर्व प्रदेशांतून आणलेले रस (पयः) तसेच दूध (सोमः) औषधीसमूह (घृतम्‌) तूप आणि (मधु) मध या सर्व वस्तू (व्यन्तु) प्राप्त करतो, त्याच्याजवळ राहून, हे यजमान, तूही (आज्यस्य) तुपाने (यज) होम करीत जा. ॥36॥
Essence
भावर्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. हे विद्वज्जनहो, जसे उत्तमप्रकारे वैद्यकविद्या शिकलेली स्त्री त्या ज्ञानापासून हितकर कर्म करण्यासाठी रात्रंदिवस यत्न करते अथवा जसे वैद्यजन लोकांचे शारीरिक रोग नष्ट करून लोकांची शारीरिक क्षमता वाढवितात, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागून सर्वांनी सुखी आणि आनंदी असावो ॥36॥
Subject
पुढील मंत्रात त्याचविषयी -