Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 33

61 Mantra
21/33
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- निचृदष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
होता॑ यक्षद् ब॒र्हि॒रूर्ण॑म्रदा भि॒षङ् नास॑त्या भि॒षजा॒श्विनाश्वा॒ शिशु॑मती भि॒षग्धे॒नुः सर॑स्वती भि॒षग्दु॒हऽइन्द्रा॑य भेष॒जं पयः॒ सोमः॑ परि॒स्रु॒ता घृ॒तं मधु॒ व्यन्त्वाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥३३॥

होता॑। य॒क्ष॒त्। ब॒र्हिः। ऊर्ण॑म्रदा॒ इत्यूर्ण॑ऽम्रदाः। भि॒षक्। ना॑सत्या। भि॒षजा॑। अ॒श्विना॑। अश्वा॑। शिशु॑म॒तीति॒ शिशु॑ऽमती। भि॒षक्। धे॒नुः। सर॑स्वती। भि॒षक्। दु॒हे। इन्द्रा॑य। भे॒ष॒जम्। पयः॑। सोमः॑। प॒रि॒स्रु॒तेति॑ परि॒ऽस्रुता॑। घृ॒तम्। मधु॑। व्यन्तु॑। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥३३ ॥

Mantra without Swara
होता यक्षद्बर्हिरूर्णम्रदा भिषङ्नासत्या भिषजाश्विनाश्वा शिशुमती भिषग्धेनुः सरस्वती भिषग्दुहऽइन्द्राय भेषजम्पयः सोमः परिस्रुता घृतम्मधु व्यन्त्वाज्यस्य होतर्यज ॥

होता। यक्षत्। बर्हिः। ऊर्णम्रदा इत्यूर्णऽम्रदाः। भिषक्। नासत्या। भिषजा। अश्विना। अश्वा। शिशुमतीति शिशुऽमती। भिषक्। धेनुः। सरस्वती। भिषक्। दुहे। इन्द्राय। भेषजम्। पयः। सोमः। परिस्रुतेति परिऽस्रुता। घृतम्। मधु। व्यन्तु। आज्यस्य। होतः। यज॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) हवन करणाऱ्या मनुष्या (हे यजमान) ज्याप्रमाणे एक (होता) (वस्त्रे) देणारे (ऊर्णमुद्राः) लोकरीपासून वस्त्र तयार करणारे लोक, (भिषक्‌) वैद्यजन, आणि (शिशुमती) दूध पिणारे (लहान पिलू) शिंगरू असलेली (अश्वा) घोडी (दुहे) (स्वतःच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी) (वा होहोन करण्यासाठी) (बर्हिः) आकाशाशी (यक्षत्‌) संयोग करते (लोकरीचे कारागीर, वैद्य व पशू आकाशातील वायू, ऊन्ह, वातावरण आदीपासून लाभ घेतात) अथवा ज्याप्रमाणे (नासत्या) सत्य व्यवहार करणारे (अश्विना) वैद्यकविद्येत प्रवीणजन (भिषजा) आपल्याहून श्रेष्ठ वैद्याशी स्नेहपूर्ण नाते ठेवतात, अथवा जसे (भिषक्‌) रोग निवारण करण्यासाठी एक (भिषक्‌) साधारण ज्ञान असलेला वैद्य (धेनुः) दूध देणाऱ्या गायीच्या दुधाशी (सरस्वती) उत्तम ज्ञानवान वाणीच्या (इन्द्राय) रोगी मनुष्याच्या रोग निवारित करण्यासाठी उपयोग करतो (प्रेमळ भाषेत रोग्याला दुधादींचे पथ्य समजावून सांगतो) तसेच जो एक याज्ञिकजन यज्ञकार्यासाठी (परिस्रुता) प्राप्त केलेल्या (विविध) वनस्पतींच्या) रसाशी (भेषजम्‌) पाण्याचे, (पयः) दुधाचे (सोमः) औषधींचे, (घृतम्‌) तुपाचे आणि (मधु) मधाचे (व्यन्तु) मिश्रण करतो (यज्ञासाठी वरील सर्व वस्तू एकत्रित करतो) त्या यज्ञकर्त्याप्रमाणे, हे यजमान, तूही (आज्यस्य) तुपानें (यज) हवन कर ॥33॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो माणूस प्राप्त विद्या, (ज्ञान, तंत्र आदी) द्वारे आणि (आपल्याहून श्रेष्ठ) विद्वनांच्या संगतीत राहून सर्व भौतिक पदार्थांपासून लाभ घेतो, तो वायू आणि अग्नीपासून ज्या प्रमाणे (तद्वत इतर सर्व, धातु, द्रव्य आदीचे) ज्ञान मिळवितो आणि सदा सुखी होतो ॥33॥
Subject
पुढील मंत्रात त्याचविषयी -