Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 28

61 Mantra
21/28
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
शै॒शि॒रेण॑ऽऋ॒तुना॑ दे॒वास्त्र॑यस्त्रि॒ꣳशेऽमृता॑ स्तु॒ताः।स॒त्येन॑ रे॒वतीः॑ क्ष॒त्रꣳ ह॒विरिन्द्रे॒ वयो॑ दधुः॥२८॥

शै॒शि॒रेण॑। ऋ॒तुना॑। दे॒वाः। त्र॒य॒स्त्रि॒ꣳश इति॑ त्रयःऽत्रि॒ꣳशे। अ॒मृताः॑। स्तु॒ताः। स॒त्येन॑। रे॒वतीः॑। क्ष॒त्रम्। ह॒विः। इन्द्रे॑। वयः॑। द॒धुः॒ ॥२८ ॥

Mantra without Swara
शैशिरेणऽऋतुना देवास्त्रयस्त्रिँशे मृता स्तुताः । सत्येन रेवतीः क्षत्रँ हविरिन्द्रे वयो दधुः ॥

शैशिरेण। ऋतुना। देवाः। त्रयस्त्रिꣳश इति त्रयःऽत्रिꣳशे। अमृताः। स्तुताः। सत्येन। रेवतीः। क्षत्रम्। हविः। इन्द्रे। वयः। दधुः॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जे (अमृताः) आपल्या आत्मरूपाने नित्य (वा अमर) आहेत, असे (स्तुताः) (देवाः) दिव्य गुण, कर्म स्वभाव असलेले विद्वान (स्तुतः) प्रशंसनीय असून (शैशिरेण, ऋतुना) हितकारी शिशिर ऋतूत (सत्येन) सत्य (भाषण आणि व्यवहार करीत) (वांछित सुख प्राप्त करतात, तसे तुम्हीही करा) तसेच (त्रयस्त्रिंशे) वसु आदी तैतीस दिव्य पदार्थांद्वारा (रेवतीः) धनवान आणि शत्रुसैन्यावर चाल करून जाणाऱ्या शूरवीर प्रजाजनांसह (इन्द्रे) आपल्या आत्म्यात (हविः) देण्या-घेण्यास योग्य (क्षत्रम्‌) असे धन वा राज्य आणि (वयः) वांछित सुख (दधुः) धारण करतात, त्या विद्वानांकडून, हे मनुष्यांनो, तुम्हीही पृथ्वी आदीच्या विषयी विद्या जाणून घ्या आणि त्यांपासून लाभ घ्या ॥28॥
Essence
भावार्थ - मागे वर्णित जे आठ वसु, अकरा रूद्र, बारा आदित्य, विद्युत आणि यज्ञ हे तेहतीस पदार्थ आहेत, त्या दिव्य पदार्थांविषयी जे लोक पूर्ण ज्ञानी असतात, ते अक्षय सुख अवश्य प्राप्त करतात ॥28॥
Subject
त्याच विषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -