Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 2

61 Mantra
21/2
Devata- वरुणो देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदाशा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑। अहे॑डमानो वरुणे॒ह बो॒ध्युरु॑शꣳस॒ मा न॒ऽआयुः॒ प्र मो॑षीः॥२॥

तत्। त्वा॒। या॒मि॒। ब्रह्म॑णा। वन्द॑मानः। तत्। आ। शा॒स्ते॒। यज॑मानः। ह॒विर्भि॒रिति॑ ह॒विःऽभिः॑। अहे॑डमानः। व॒रु॒ण॒। इ॒ह। बो॒धि॒। उरु॑शꣳसेत्युरु॑ऽशꣳस। मा। नः॒। आयुः॑। प्र। मो॒षीः॒ ॥२ ॥

Mantra without Swara
तत्त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः । अहेडमानो वरुणेह बोध्युरुशँस मा न आयुः प्रमोषीः ॥

तत्। त्वा। यामि। ब्रह्मणा। वन्दमानः। तत्। आ। शास्ते। यजमानः। हविर्भिरिति हविःऽभिः। अहेडमानः। वरुण। इह। बोधि। उरुशꣳसेत्युरुऽशꣳस। मा। नः। आयुः। प्र। मोषीः॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वरूण) अत्युत्तम विद्वान, जसा (यजमानः) (हविर्भिः) आहवनीय वा होम करण्यास योग्य पदार्थाद्वारे (यज्ञ करून) (तत्‌) त्याच्या लाभाची (आ, शास्ते) इच्छा करतो, त्याप्रमाणे (ब्रह्मणा) वेदाच्या विज्ञानाद्वारे (वन्दमानः) आपली स्तुती करीत मी (एक ज्ञानार्थी) (त्वा) आपणाकडे (यामि) आलो आहे. हे (अरूशंस) अनेक जनांद्वारे प्रशंसित) आपण माझ्याकडून (अहेडमानः) केल्या जाणाऱ्या सत्काराचा (व स्तुतीचा) (स्वीकार करा) आणि (इह) या संसारात (नः) आमच्या (आयुः) जीवन अथवा ज्ञान, यांना (मा) (प्र, मोषी) चोरून घेऊ नका (आम्हाला जे ज्ञान द्यायचे आहे, ते पूर्णपणे द्या. आमच्यापासून काही ज्ञान वा विद्या लपवून ठेवू नका) आणि अशा रीतीने आमचे (ज्ञानार्थीचे) (बोधि) प्रबोधन करा ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो मनुष्य ज्या व्यक्तीकडून विद्या ग्रहण करीत असेल, त्याने त्या (शिक्षक) व्यक्तीस प्रथम नमस्कार केला पाहिजे. तसेच जो अध्यापक आहे, त्याने कधीही अध्यापनात कपट करू नये (सर्व ज्ञान, पूर्ण विद्या शिकवावी) तसेच कोणीही विद्यार्थ्याने आपल्या आचार्याचा कधीही अपमान करू नये. ॥2॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात तोच विषय -