Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 18

61 Mantra
21/18
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
दैव्या॒ होता॑रा भि॒षजेन्द्रे॑ण स॒युजा॑ यु॒जा।जग॑ती॒ छन्द॑ऽइन्द्रि॒यम॑न॒ड्वान् गौर्वयो॑ दधुः॥१८॥

दैव्या॑। होता॑रा। भि॒षजा॑। इन्द्रे॑ण स॒युजेति॑ स॒ऽयुजा॑। यु॒जा। जग॑ती। छन्दः॑। इ॒न्द्रि॒यम्। अ॒न॒ड्वान्। गौः। वयः॑। द॒धुः॒ ॥१८ ॥

Mantra without Swara
दैव्या होतारा भिषजेन्द्रेण सयुजा युजा । जगती छन्दऽइन्द्रियमनड्वान्गौर्वयो दधुः ॥

दैव्या। होतारा। भिषजा। इन्द्रेण सयुजेति सऽयुजा। युजा। जगती। छन्दः। इन्द्रियम्। अनड्वान्। गौः। वयः। दधुः॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (भिषजा) दोन उत्तम वैद्य (इन्द्रेण) आपल्याजवळील धनादीद्वारे (सयुजा) हितकर औषधीचा योग (युजा) मोठ्या सावधपणे निर्माण करतात (योग्य औषधी तयार करतात) (दैव्या) वैद्यकविद्येत प्रवीण आणि (होतारा) आयुर्वेद आदी विद्या प्रदान करणारे ते वैद्य (अनड्वान्‌) बैल (गौः) गौ, (जगती छन्दः) जगती छंद (त्या छंदातील मंत्रांत सांगितलेल्या विचाराप्रमाणे (वयः) सुंदर (इन्द्रियम्‌) धन (दधुः) धारण करतात, त्याप्रमाणे हे मनुष्यानो, तुम्हीही त्या उपायांनी धन धारण करा. (पशु-पालन, वैद्यकविद्या आदी वेदोपदेशाद्वारे संपत्ती अर्जित करा) ॥18॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे वैद्य आपले आसपासच्या सर्वच लोकांच्या रोगांचे निवारण करून स्वतः ऐश्वर्यवान होतात आणि इतरांनाही तसे करतात, तद्वत सर्व माणसांनी वागले पाहिजे. ॥18॥
Subject
पुढील मंत्रात म्हटले आहे की वैद्याप्रमाणेच सर्व लोकांनी आचरण केले पाहिजे -