Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 13

61 Mantra
21/13
Devata- विद्वांसो देवता Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
तनू॒नपा॒च्छुचि॑व्रतस्तनू॒पाश्च॒ सर॑स्वती।उ॒ष्णिहा॒ छन्द॑ऽइन्द्रि॒यं दि॑त्य॒वाड् गौर्वयो॑ दधुः॥१३॥

तनू॒नपा॒दिति॒ तनू॒ऽनपा॑त्। शुचि॑ऽव्रतः। त॒नू॒पा इति॑ तनू॒ऽपाः। च॒। सर॑स्वती। उ॒ष्णिहा॑। छन्दः॑। इ॒न्द्रि॒यम्। दि॒त्य॒वाडिति॑ दित्य॒ऽवाट्। गौः। वयः॑। द॒धुः॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
तनूनपाच्छुचिव्रतस्तनूपाश्च सरस्वती । उष्णिहा छन्द इन्द्रियन्दित्यवाड्गौर्वयो दधुः ॥

तनूनपादिति तनूऽनपात्। शुचिऽव्रतः। तनूपा इति तनूऽपाः। च। सरस्वती। उष्णिहा। छन्दः। इन्द्रियम्। दित्यवाडिति दित्यऽवाट्। गौः। वयः। दधुः॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे एक (सुचिव्रतः) पवित्र धर्माचरण करणारा मनुष्य (तनूनपात्‌) आपल्या शरीराची हानी वा क्षति होऊ देत नाही (तनपाः) या उलट शरीररक्षणाची सतत काळजी घेतो (च) तसेच ज्याप्रमाणे (सरस्वती) वाणी (उष्णिहा) उष्णिह्‌ (छन्दः) आणि (इन्द्रियम्‌) जीवनाची लक्षणें व्यक्त करते (वाणीने उष्णिह छंदाचे गायन केल्याने जीवनशक्ती वाढते) (त्याप्रमाणे विद्वानांनी केले पाहिजे) तसेच जसे (दित्यवाट्) खंडनीय (वा तुठणाऱ्या भंगणाऱ्या) पदार्थांना काळजीपूर्वक सांभाळणारा माणूस आणि (गौः) एक प्रशंसा करणारा माणूस (वयः) आपल्या इच्छा वाढवितो (माणसाच्या इच्छा आणि प्रशंसा करून काही द्रव्यादींची कामना करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा अपरिमित असतात) तसेच विद्वानांनी करावे (दधुः) (धर्माचरण आणि शरीररक्षा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.) ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक सदाचारी असतात आणि ज्यांची वाणी सुसंस्कृत असून जे सुशिक्षित असतात, ते पूर्ण आयुष्य अवश्य भोगतात ॥13॥
Subject
पुन्हा तोच विषय (विद्वान) -