Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 12

61 Mantra
21/12
Devata- अग्निर्देवता Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
समि॑द्धोऽअ॒ग्निः स॒मिधा॒ सुस॑मिद्धो॒ वरे॑ण्यः।गा॒य॒त्री छन्द॑ऽइन्द्रि॒यं त्र्यवि॒र्गौर्वयो॑ दधुः॥१२॥

समि॑द्ध॒ऽइति॒ सम्ऽइ॑द्धः। अग्निः। स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। सुस॑मिद्ध॒ इति॒ सुऽस॑मिद्धः। वरे॑ण्यः। गा॒य॒त्री। छन्दः॑। इ॒न्द्रि॒यम्। त्र्यवि॒रिति॒ त्रिऽअ॑विः। गौः। वयः॑। द॒धुः॒ ॥१२ ॥

Mantra without Swara
समिद्धोऽअग्निः समिधा सुसमिद्धो वरेण्यः । गायत्री छन्द इन्द्रियन्त्र्यविर्गौर्वयो दधुः ॥

समिद्धऽइति सम्ऽइद्धः। अग्निः। समिधेति सम्ऽइधा। सुसमिद्ध इति सुऽसमिद्धः। वरेण्यः। गायत्री। छन्दः। इन्द्रियम्। त्र्यविरिति त्रिऽअविः। गौः। वयः। दधुः॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे (समिद्धः) चांगल्याप्रकारे पेटलेला अग्नी आपल्या (समिधा) उत्तम प्रकाशाने, (सुसमिद्धः) अत्यंत देदीप्यमान सूर्य (वरेण्यः) आणि वरणीय विद्वान तसेच (गायत्री, छन्दः) गायत्री छंद (इन्द्रियम्‌) मनाला प्राप्त होतो (प्रदीप्त अग्नी, सुर्य, विद्वान आणि गायत्री छंद, हे सर्व जसे मनाला प्रसन्न करणारे आहेत,) (तसेच विद्वानांनी या सर्व वस्तूंना प्रिय मानावे) तसेच ज्याप्रमाणे (त्र्यविः) शरीर, इंद्रियें आणि आत्मा या तीन्हीही रक्षा करणारा (या तीन्हीवर संयम, नियंत्रण ठेवणारा) आणि (गौः) स्तुती करणारा माणूस (वयः) जीवन (वा जीवनशक्ती) वाढविणारा असतो, तद्वत विद्वान लोकांनी शरीरादीचे रक्षण आणि जीवनशक्तीची वृद्धी करावी. ॥12॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. (समाजातील) विद्वान लोकांनी आपल्या विद्येचे दान करीत सर्वांचा आत्मा प्रकाशित करावा आणि सर्वांना जितेंद्रिय करून दीर्घायुषी केले पाहिजे ॥12॥
Subject
पुन्हा विद्वानांविषयी -