Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 1

61 Mantra
21/1
Devata- वरुणो देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ॒मं मे॑ वरुण श्रु॒धी हव॑म॒द्या च॑ मृडय। त्वाम॑व॒स्युरा च॑के॥१॥

इम॒म्। मे॒। व॒रु॒ण॒। श्रु॒धि। हव॑म्। अ॒द्य। च॒। मृ॒ड॒य॒। त्वाम्। अ॒व॒स्युः। आ। च॒के॒ ॥१ ॥

Mantra without Swara
इमम्मे वरुण श्रुधी हवमद्या च मृडय । त्वामस्वस्युरा चके ॥

इमम्। मे। वरुण। श्रुधि। हवम्। अद्य। च। मृडय। त्वाम्। अवस्युः। आ। चके॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे (वरूण) उत्तम विद्यावान (वरणीय) विद्वान महोदय, मी (एक जिज्ञासू विद्यार्थी) (अवस्युः) स्वतःचे रक्षणाची (कल्याणाची) इच्छा मनी घेऊन (इमम्‌) या (त्वाम्‌) आपल्यासारख्या (विद्वानाची) (आ, चके) कामना करीत आहे. आपण (मे) माझी ही (हवम्‌) स्तुती वा प्रार्थना (श्रुधि) ऐका (च) आणि (अद्य) आज (ज्ञान व उपदेश देऊन) मला (मृडय) सुखी करा ॥1॥
Essence
भावार्थ - सर्व विद्यार्थी वा जिज्ञासूजनांचे कर्तव्य आहे की त्यानी क्रमाने आपल्यापेक्षा अधिक विद्वानाकडे ज्ञानप्राप्तीसाठी जावे. तसेच अध्यापकांनी (जवळ आलेल्या जिज्ञासू विद्यार्थ्याच्या) स्वाध्याय, पूर्वी प्राप्त केलेल्या ज्ञानाची स्थितीची माहिती घ्यावी आणि त्याची परीक्षा घेऊन त्यास (वा सर्व ज्ञानार्थी जनांना) आनंदित करावे ॥1॥
Subject
आता एकविसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात विद्वानांविषयी कथन केले आहे -