Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 90

90 Mantra
20/90
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒श्विना॑ पिबतां॒ मधु॒ सर॑स्वत्या स॒जोष॑सा।इन्द्रः॑ सु॒त्रामा॑ वृत्र॒हा जु॒षन्ता॑ सो॒म्यं मधु॑॥९०॥

अ॒श्विना॑। पि॒ब॒ता॒म्। मधु॑। सर॑स्वत्या। स॒जोष॒सेति स॒ऽजोष॑सा। इन्द्रः॑। सु॒त्रामेति॑ सु॒ऽत्रामा॑। वृ॒त्र॒हेति॑ वृत्र॒ऽहा। जु॒षन्ता॑म्। सो॒म्यम्। मधु॑ ॥९० ॥

Mantra without Swara
अश्विना पिबताम्मधु सरस्वत्या सजोषसा । इन्द्रः सुत्रामा वृत्रहा जुषन्ताँ सोम्यं मधु ॥

अश्विना। पिबताम्। मधु। सरस्वत्या। सजोषसेति सऽजोषसा। इन्द्रः। सुत्रामेति सुऽत्रामा। वृत्रहेति वृत्रऽहा। जुषन्ताम्। सोम्यम्। मधु॥९०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (सजोषसा) समानरूपेण अथवा मिळून सर्व वस्तूंचा उपयोग घेणारे (अश्विना) अद्यापक आणि उपदेशक (सरस्वत्या) उत्तम सुसंस्कृत वाणीद्वारा (मधु) मधुर म्हणजे उपयोगी व प्रिय असे विशेष ज्ञान (पिबताम्‌) पितात (दोघे मधुर भाषणाद्वारे लाभकारी ज्ञान लोकांना देतात) (तसे तुम्हीदेखील केले पाहिजे) तसेच जसा (सुत्रामा) तो सुरक्षक आणि (वृत्रहा) सूर्याप्रमाणे आचरण करणारा (इन्द्रः) ऐश्वर्यशाली मनुष्य (सोम्यम्‌) सोमलता आदी औषधींमधे उत्पन्न होणाऱ्या (मधुः) मधुर आदी गुणांनी युक्त अन्नाचे (जुषन्ताम्‌) सेवन करतो, तसे तुम्ही सर्व जणांनीदेखील केले पाहिजे (आपल्याकडील ज्ञान इतरांना द्यायला पाहिजे आणि सोम आदी औषधींचा रस तुमच्या भोजनात असायला पाहिजे) ॥90॥
Essence
भावार्थ - समाजातील अध्यापक आणि उपदेश देण्याची क्षमता असणाऱ्या लोकांनी आपल्याप्रमाणेच समाजातील सर्व लोकांचे सुख आणि ज्ञान वाढविण्याचे यत्न केले पाहिजेत की ज्यामुळे सर्व लोक सुखी होतील ॥90॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -
Footnote
या (विसाव्या) अध्यायात राजा आणि प्रजा, धर्माचे अंग आणि अंगी (धर्म), गृहाश्रमाचे कर्तव्य, ब्राह्मण, क्षत्रिय, सत्यव्रत, देवांचे गुण, प्रजापालक, अभय, एकमेकाविषयी प्रीती व सहमती, स्त्रियांचे गुण व धन आदीची वृद्धी, या सर्व विषयांचे वर्णन केले असून या अध्यायाची संगती यापूर्वीच्या (एकोणिसाव्या) अध्यायाच्या अर्थाशी आहे, हे जाणावे. ॥^यजुर्वेदाचा विसावा अध्याय (त्याच्या मराठी अनुवादासह) समाप्त