Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 87

90 Mantra
20/87
Devata- इन्द्रो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इन्द्राया॑हि चित्रभानो सु॒ताऽइ॒मे त्वा॒यवः॑। अण्वी॑भि॒स्तना॑ पू॒तासः॑॥८७॥

इन्द्र॑। आ। या॒हि॒। चि॒त्र॒भा॒नो॒ इति॑ चित्रऽभानो। सु॒ताः। इ॒मे। त्वा॒यव॒ इति॑ त्वा॒ऽयवः॑। अण्वी॑भिः। तना॑। पू॒तासः॑ ॥८७ ॥

Mantra without Swara
इन्द्रायाहि चित्रभानो सुता इमे त्वायवः । अण्वीभिस्तना पूतासः ॥

इन्द्र। आ। याहि। चित्रभानो इति चित्रऽभानो। सुताः। इमे। त्वायव इति त्वाऽयवः। अण्वीभिः। तना। पूतासः॥८७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (चित्रभानो) चित्र-विचित्र (वा विविध प्रकारच्या विद्या जाणणाऱ्या हे (इन्द्र) सभापती, आपण (इमे) या (अण्वीभिः) अंगुलीद्वारे (सुता) तयार केलेले (तना) विस्तार केलेले जे (पूतासः) पवित्र असे पदार्थ आहेत (कलाकारानी निर्माण केलेले (वस्त्र, आभूषण, शास्त्र, अंथरूण, पलंग आदी) सर्व पदार्थ (आ, याहि) प्राप्त करा (सभापती वा राजा, यांनी उत्तमोत्तम वस्त्रादींचा वापर केला पाहिजे. राजसी वस्त्रादीमुळे ते सुशोभित होतात आणि प्रजा आपल्या सुंदर रूपधारी राजाला पाहून आनंदित होते) ॥87॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी नेहमी पदार्थ शुद्ध करून वापरावेत. ते (पांघरणे, नेसणे वा खाण्या-पिण्याचे पदार्थ) योग्य त्या रीतीने तयार केले पाहिजेत) ॥87॥
Subject
आता सामान्य उपदेश पुढील मंत्रात केला आहे -