Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 84

90 Mantra
20/84
Devata- सरस्वती देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पा॒व॒का नः॒ सर॑स्वती॒ वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती। य॒ज्ञं व॑ष्टु धि॒याव॑सुः॥८४॥

पा॒व॒का। नः॒। सर॑स्वती। वाजे॑भिः। वा॒जिनी॑व॒तीति॑ वा॒जिनी॑ऽवती। य॒ज्ञम्। व॒ष्टु॒। धि॒याव॑सु॒रिति॑ धि॒याऽव॑सुः ॥८४ ॥

Mantra without Swara
पावका नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । यज्ञँवष्टु धियावसुः ॥

पावका। नः। सरस्वती। वाजेभिः। वाजिनीवतीति वाजिनीऽवती। यज्ञम्। वष्टु। धियावसुरिति धियाऽवसुः॥८४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सामान्यजन म्हणतात) हे अध्यापक आणि उपदेशकजनहो, ज्याप्रमाणे (वाजेभिः) ज्ञान-विज्ञान आदी गुणांनी (वाजिनीवती) गुणवती, विद्यावती झालेली (पावका) पवित्र करणारी आणि (धियावसुः) बुद्धिचातुर्यामुळे धन प्राप्त करून देणारी (सरस्वती) सुसंस्कृत वाणी (वा मधुर प्रिय भाषा) वाढवेल, तुम्ही, विद्वान व उपदेशक लोक आम्हा (याज्ञिक गृहस्थजनांना) तसा उपदेश करा (वा तशी मधुर वाणी शिकवा) (यज्ञ करणाऱ्याची वाणी सुसंस्कृत व मधुर असावी.) ॥84॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्व लोकांनी धर्मात्मा अध्यापक आणि ज्ञान-विज्ञानाची सदा वृद्धी करीत जावे. ॥84॥
Subject
पुढील मंत्रात अध्यापक आणि उपदेशक विषयी -