Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 75

90 Mantra
20/75
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ता भि॒षजा॑ सु॒कर्म॑णा॒ सा सु॒दुघा॒ सर॑स्वती।स वृ॑त्र॒हा श॒तक्र॑तु॒रिन्द्रा॑य दधुरिन्द्रि॒यम्॥७५॥

ता। भि॒षजा॑। सु॒कर्म॒णेति॑ सु॒ऽकर्म॑णा। सा। सु॒दुघेति॑ सु॒ऽदुघा॑। सर॑स्वती। सः। वृ॒त्र॒हेति॑ वृत्र॒ऽहा। श॒तक्र॑तुः। इन्द्रा॑य। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम् ॥७५ ॥

Mantra without Swara
ता भिषजा सुकर्मणा सा सुदुघा सरस्वती । स वृत्रहा शतक्रतुरिन्द्राय दधुरिन्द्रियम् ॥

ता। भिषजा। सुकर्मणेति सुऽकर्मणा। सा। सुदुघेति सुऽदुघा। सरस्वती। सः। वृत्रहेति वृत्रऽहा। शतक्रतुः। इन्द्राय। दधुः। इन्द्रियम्॥७५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (ता) ते (भिषजा) शरीर व आत्म्याच्या दोषांचे निवारण करणारे आणि (सुकर्मणा) श्रेष्ठ धर्मातील आचरण करणारे दोन वैद्य तसेच (सा) ती (सुदुघा) यथेच्छ इच्छा पूर्ण करणारी (सरस्वती) पूर्ण विद्यावान जी स्त्री आहे, (त्या सर्वांनी (सः) त्या (वृत्रहा) मेघनाशक सूर्याप्रमाणे (शतक्रतुः) अत्यंत बुद्धिमान (हितकारी) (इन्द्राय) ऐश्वर्यप्राप्तीसाठी (इन्द्रियम्‌) धनाचे (दधुः) धारण करावे (वैद्य औषधी संग्रहासाठी आणि विदुषी स्त्रिया हितकारी संपत्तीसाठी यत्न करतात) तद्वत हे मनुष्यानो, तुम्हीदेखील तसे यत्न करा (म्हणजे तुमचे ऐश्वर्य वाढेल) ॥75॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. या संसारात जसे विद्वज्जन श्रेष्ठ आचरण करणाऱ्या मनुष्याप्रमाणे सदाचरण करीत विद्या आणि धनाचे अर्जन करतात, तद्वत सर्व लोकांनी केले पाहिजे ॥75॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात त्याच विषयी -