Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 63

90 Mantra
20/63
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ति॒स्रस्त्रे॒धा सर॑स्वत्य॒श्विना॒ भार॒तीडा॑।ती॒व्रं प॑रि॒स्रुता॒ सोम॒मिन्द्रा॑य सुषुवु॒र्मद॑म्॥६३॥

ति॒स्रः। त्रे॒धा। सर॑स्वती। अ॒श्विना॑। भार॑ती। इडा॑। ती॒व्रम्। प॒रि॒स्रुतेति॑ परि॒ऽस्रुता॑। सोम॑म्। इन्द्रा॑य। सु॒षु॒वुः॒। सु॒सु॒वु॒रिति॑ सुसुवुः। मद॑म् ॥६३ ॥

Mantra without Swara
तिस्रस्त्रेधा सरस्वत्यश्विना भारतीडा । तीव्रम्परिस्रुता सोममिन्द्राय सुषुवुर्मदम् ॥

तिस्रः। त्रेधा। सरस्वती। अश्विना। भारती। इडा। तीव्रम्। परिस्रुतेति परिऽस्रुता। सोमम्। इन्द्राय। सुषुवुः। सुसुवुरिति सुसुवुः। मदम्॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (सरस्वती) चांगल्या योग्य रीती (1) वाणी (वा भाषण, उच्चारण आदी) शिकविणारी स्त्री, (2) (भारती) धारण-पालन करणारी माता आणि (3) (इडा) प्रशंसनीय हितकर उपदेश देणारी स्त्री या (तिस्रः) तिघी (इन्द्राय) ऐश्वर्य, (वा स्वास्थ रूप संपदा) प्राप्त करण्यासाठी (परिस्रुता) वेगाने वाहणाऱ्या निर्झराप्रमाणे (तीव्रम्‌) तीव्रगुणधारक (मदम्‌) हर्ष उत्पन्न करणारा (सोमम्‌) औषधीरस (त्रेधा) तीन पद्धतीने (सुषुवः) तयार करतात (आणि इतरांना नीरोग होण्यासाठी देतात) हे मनुष्यानो, तुम्हीही (त्या विदुषी स्त्रियांचे व कुशल वैद्याचे अनुकरण करा.) ॥63॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे उपयुक्त आहे की त्यांनी सोम आदी औषधींचा रस काढावा. ते योग्यप्रकारे तयार करून प्यावा आणि त्याद्वारे शरीराचे आरोग्य राखावे, वाणी शुद्ध करावी आणि बुद्धी व वक्तृत्वशक्तीचा विकास करावा. ॥63॥
Subject
यानंतर भैपज्य आदी विषयी -