Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 62

90 Mantra
20/62
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पा॒तं नो॑ऽअश्विना॒ दिवा॑ पा॒हि नक्त॑ꣳ सरस्वति।दैव्या॑ होतारा भिषजा पा॒तमिन्द्र॒ꣳ सचा॑ सु॒ते॥६२॥

पा॒तम्। नः॒। अ॒श्वि॒ना॒। दिवा॑। पा॒हि। नक्त॑म्। स॒र॒स्व॒ति॒। दैव्या॑। हो॒ता॒रा॒। भि॒ष॒जा॒। पा॒तम्। इन्द्र॑म्। सचा॑। सु॒ते ॥६२ ॥

Mantra without Swara
पातन्नोऽअश्विना दिवा पाहि नक्तँ सरस्वति । दैव्या होतारा भिषजा पातामिन्द्रँ सचा सुते ॥

पातम्। नः। अश्विना। दिवा। पाहि। नक्तम्। सरस्वति। दैव्या। होतारा। भिषजा। पातम्। इन्द्रम्। सचा। सुते॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सामाजिकजन वा गृहस्थ स्त्रीपुरुष) प्रार्थना करीत आहेत) हे (दैव्या) दिव्यगुणसंपन्न, (अश्विना) अध्यापन करणाऱ्या आणि उपदेश देणाऱ्या श्रेष्ठजनहो, तुम्ही (दिवा) दिवसा आणि (नक्तम्‌) रात्री (नः) आमची (पातम्‌) रक्षा करा. हे (सरस्वति) अनेक विद्यासंपन्न माते, तूही आमचे (पाहि) रक्षण कर. हे (होतारा) सर्वांना सुख देणाऱ्या (सचा) ऐक्याने राहणाऱ्या (भिषजा) वैद्यजनहो, तुम्ही (सुते) या उत्पन्न जगात (इन्द्रम्‌) ऐश्वर्य देणाऱ्या सोमलता (आदी औषधींच्या) रसाद्वारे आम्हा स्त्री-पुरुषांचे (पातम्‌) रक्षण करा. ॥62॥
Essence
भावार्थ - जसे निष्णात वैद्य रोगनाशक औषधीं विषयी ज्ञानी असतात, त्याप्रमाणे अध्यापक आणि उपदेशक जनांनी आणि माता-पित्यांनी अविद्यारूप रोग दूर करणाऱ्या उपायांविषयी जाणावे (वा शोध करून अज्ञान नष्ट करावे) ॥62॥
Subject
पुढील मंत्रात सामयिक रक्षा विषयीं आणि मैषज्यशास्त्राविषयी कथन केले आहे -