Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 60

90 Mantra
20/60
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
क॒व॒ष्यो न व्यच॑स्वतीर॒श्विभ्यां॒ न दुरो॒ दिशः॑।इन्द्रो॒ न रोद॑सीऽउ॒भे दु॒हे कामा॒न्त्सर॑स्वती॥६०॥

क॒व॒ष्यः᳕। न। व्यच॑स्वतीः। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। न। दुरः॑। दिशः॑। इन्द्रः॑। न। रोद॑सी॒ऽइति॒ रोद॑सी। उ॒भेऽइत्यु॒भे। दु॒हे। कामा॑न्। सर॑स्वती ॥६० ॥

Mantra without Swara
कवष्यो न व्यचस्वतीरश्विभ्यान्न दुरो दिशः । इन्द्रो न रोदसी उभे दुहे कामान्त्सरस्वती॥

कवष्यः। न। व्यचस्वतीः। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। न। दुरः। दिशः। इन्द्रः। न। रोदसीऽइति रोदसी। उभेऽइत्युभे। दुहे। कामान्। सरस्वती॥६०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मी (सरस्वती) एक श्रेष्ठ ज्ञानवती (गृहस्थ) स्त्री (न) ज्याप्रमाणे (इन्द्रः) विद्युत (अंधकाराचा नाश करते, तद्वत आणि (न) ज्याप्रमाणे (अश्विभ्याम्‌) सूर्य आणि चंद्रमा (अंधकार दूर करून) (कवष्यः) अत्यंत प्रशंसनीय (दिशांना (दुरः) घराच्या द्वारांना (वा अंतर्भागांना) (न) वा ज्याप्रमाणे ते (उभे) सूर्यचंद्र (रोदसी) आकाशाला व पृथ्वीला (उजळून टाकतात, (न) तद्वत मी (एक गृहस्थ स्त्री) (कामान्‌) आपल्या सर्व कामना (दुहे) पूर्ण करते (वाटेत येणाऱ्या संकटांना दूर सारून घराला ऐश्वर्य आणि समाधानाने भरते, असा विश्वास माझ्या हृदयात आहे) ॥60॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे विद्युत, सूर्य आणि चंद्र यांच्या साहाय्याने घर-द्वाराचा अंधार दूर करते आणि ज्याप्रमाणे ती विद्युत आणि प्रकाश आपल्या शक्तीद्वारा व प्रकाशाद्वारे धारण करीत आहे तद्वत एक हुशार ज्ञानवती स्त्री पुरुषार्थाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते (वा करू शकते) ॥60॥
Subject
अता विद्वज्जनां विषयी -