Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 59

90 Mantra
20/59
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒श्विना॒ नमु॑चेः सु॒तꣳ सोम॑ꣳ शु॒क्रं प॑रि॒स्रुता॑। सर॑स्वती॒ तमाभ॑रद् ब॒र्हिषेन्द्रा॑य॒ पात॑वे॥५९॥

अ॒श्विना॑। नमु॑चेः। सु॒तम्। सोम॑म्। शु॒क्रम्। प॒रि॒स्रुतेति॑ परि॒ऽस्रुता॑। सर॑स्वती। तम्। आ। अ॒भ॒र॒त्। ब॒र्हिषा॑। इन्द्रा॑य। पात॑वे ॥५९ ॥

Mantra without Swara
अश्विना नमुचेः सुतँ सोमँ शुक्रम्परिस्रुता । सरस्वती तामाभरद्बर्हिषेन्द्राय पातवे ॥

अश्विना। नमुचेः। सुतम्। सोमम्। शुक्रम्। परिस्रुतेति परिऽस्रुता। सरस्वती। तम्। आ। अभरत्। बर्हिषा। इन्द्राय। पातवे॥५९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जी सर्वथा (परिस्रुता) श्रेष्ठ आचरण करणारी (अश्विना) शुभ गुणकर्मस्वभाव धारण करणारी (सरस्वती) प्रशंसनीय असते अशी स्त्री (ऐश्वर्य तथा नीरोगता प्राप्त करते) तसेच प्रशंसनीय पुरूष देखील (स्त्रीप्रमाणे) (बर्हिषा) सुखवर्धक कर्मांद्वारे (उत्तम कर्म करीत) (इन्द्राय) परमैश्वर्य प्राप्तीसां आणि (नमुचः) न सोडणाऱ्या (म्हणजे असाध्य) रोगांपासून मुक्त होण्यासाठी (शुक्रम्‌) वीर्यवर्धक (सुतम्‌) चांगल्याप्रकारे तयार केलेल्या (सोमम्‌) सोम आदी औषधींच्या (पातवे) रक्षणासाठी (तम्‌) त्या औषधीरसाला (आ, आभरत्‌) संग्रहीत करतो (घरी औषधी व रस नेहमी तयार ठेवतो अथवा) तयार ठेवते, ते स्त्री-पुरूष सदा सर्वदा सुखी होतात ॥59॥
Essence
भावार्थ - जे लोक (स्त्री वा पुरूष) अंग, उपांगासहित वेदांचे अध्ययन करतात आणि (त्याप्रमाणे पदार्थांचा उचित उपयोग अथवा औषधी निर्माणाचे तंत्र जाणतात) ते प्रात्यक्षिक आचरण करणारे लोक असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांना देखील साध्य करू शकतात ॥59॥
Subject
पुढील मंत्रात त्याच विषयी -