Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 56

90 Mantra
20/56
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
त॒नू॒पा भि॒षजा॑ सु॒तेऽश्विनो॒भा सर॑स्वती।मध्वा॒ रजा॑सीन्द्रि॒यमिन्द्रा॑य प॒थिभि॑र्वहान्॥५६॥

त॒नू॒पेति॑ तनू॒ऽपा। भि॒षजा॑। सु॒ते। अ॒श्विना॑। उ॒भा। सर॑स्वती। मध्वा॑। रजा॑सि। इ॒न्द्रि॒यम्। इन्द्रा॑य। प॒थिभि॒रिति॑ प॒थिऽभिः॑। व॒हा॒न् ॥५६ ॥

Mantra without Swara
तनूपा भिषजा सुते स्विनोभा सरस्वती । अध्वा रजाँँसीन्द्रियमिन्द्राय पथिभिर्वहान् ॥

तनूपेति तनूऽपा। भिषजा। सुते। अश्विना। उभा। सरस्वती। मध्वा। रजासि। इन्द्रियम्। इन्द्राय। पथिभिरिति पथिऽभिः। वहान्॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (भिषजा) वैद्यकविद्या जाणणारे (आणि त्याद्वारे) (तनूपा) आपल्या देहाचे रक्षण करणारे (अश्विना) शुभगुणकर्मस्वभाव असलेले (उभा) दोघे स्त्री-पुरुष (पति-पत्नी) जसे (सरस्वती) विज्ञानमय वाणी (बोलतात) (आणि त्यांची ती वाणी) (मध्वा) मधुर असून (सुते) या (परमेश्वराने उत्पन्न केलेल्या) जगात मान्य होते (त्यांना जगात आदर-मान मिळतो) आणि ते दोघे (पथिभिः) सुयोग्य मार्ग वा उपायांद्वारे (इन्द्राय) आपल्या राजासाठी (रजांसि) विवधि लोक (प्रदेश वा भूमी) आणि (इन्द्रियम्‌) धन प्राप्त करतात (वा त्यानी प्राप्त करावे) तद्वत हे मनुष्यानो, तुम्ही देखील करीत जा ॥56॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर समाजातील सर्व स्त्री-पुरुषांनी वैद्यकशास्त्र (वा आपले स्वास्थ्य सांभाळण्याविषयीचे पथ्य-आहारादीचे नियम) जाणले वा पाळले नाहीत, तर ते रोगापासून आपला बचाव कसे करतील आणि आपले शरीर नीरोगी कसे ठेवतील? तसेच धर्म-मय कार्यें करण्यात कसे यशस्वी होतील! ॥56॥
Subject
आता पुढील मंत्रात याच विषयाचा संदर्भात वैद्यसविद्येसंबंधी -