Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 50

90 Mantra
20/50
Devata- इन्द्रो देवता Rishi- गर्ग ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
त्रा॒तार॒मिन्द्र॑मवि॒तार॒मिन्द्र॒ꣳ हवे॑हवे सु॒हव॒ꣳ शूर॒मिन्द्र॑म्। ह्वया॑मि श॒क्रं पु॑रुहू॒तमिन्द्र॑ꣳ स्व॒स्ति नो॑ म॒घवा॑ धा॒त्विन्द्रः॑॥५०॥

त्रा॒तार॑म्। इन्द्र॑म्। अ॒वि॒तार॑म्। इन्द्र॑म्। हवे॑हव॒ इति॒ हवे॑ऽहवे। सु॒हव॒मिति॑ सु॒ऽहव॑म्। शूर॑म्। इन्द्र॑म्। ह्वया॑मि। श॒क्रम्। पु॒रु॒हू॒तमिति॑ पुरुऽहू॒तम्। इन्द्र॑म्। स्व॒स्ति। नः॒। म॒घवेति॑ म॒घऽवा॑। धा॒तु॒। इन्द्रः॑ ॥५० ॥

Mantra without Swara
त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्रँ हवेहवे सुहवँ शूरमिन्द्रम् । ह्वयामि शक्रम्पुरुहूतमिन्द्रँ स्वस्ति नो मघवा धात्विन्द्रः ॥

त्रातारम्। इन्द्रम्। अवितारम्। इन्द्रम्। हवेहव इति हवेऽहवे। सुहवमिति सुऽहवम्। शूरम्। इन्द्रम्। ह्वयामि। शक्रम्। पुरुहूतमिति पुरुऽहूतम्। इन्द्रम्। स्वस्ति। नः। मघवेति मघऽवा। धातु। इन्द्रः॥५०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सभापती (सेनापती) मी (एक राजपुरूष, एक प्रजाजन वा मंत्री) (हवे हवे) प्रत्येक युद्धाच्यावेळी (आपणांला बोलावतो वा रक्षणासाठी हाक मारतो) (त्रातारम्‌) आमचे रक्षण करणाऱ्या (इन्द्रम्‌) दुष्टांचा नाश करणाऱ्या (अवितारम्‌) आमच्यावर प्रीती करणाऱ्या (इन्द्रम्‌) उत्तम ऐश्वर्य देणाऱ्या (सुहवम्‌) बोलावल्यानंतर (हाक दिल्यानंतर) त्वरित येणाऱ्या आणि (शूरम्‌) आमच्या शूर सेनापतीला (आम्ही आवाहन करीत आहोत.) तसेच (इन्द्रम्‌) राज्य चालविणाऱ्या (शक्र) कार्याची पूर्तता त्वरित करणाऱ्या (पुरुहूतम्‌) अनेकांद्वारे आवाहन केलेल्या (इन्द्रम्‌) शत्रुसैन्याचा विध्वंस करणाऱ्या आपणाला, हे सेनापती, मी (हृयामि) आदराने बोलावीत आहे. असे (मघवा) अतिधनसंपन्न (इन्द्रः) सेनेचे उत्तम संचालन करणारे आपण (नः) आम्हा (प्रजाजनांसाठी (स्वस्ति) कल्याण (धातू) धारण करा (ज्या ज्या वेळी आम्ही प्रजाजन आपणास हाक देऊ, त्या त्या वेळी आपण धावून या) ॥50॥
Essence
भावार्थ - त्याच मनुष्याचा लोकांनी सत्कार केला पाहिजे की जो विद्या, न्याय आणि धर्माप्रमाणे वागणारा असून सुशील आणि जितेंद्रिय असेल आणि जो सर्वांसाठी सुखाची वृद्धी करणारा असेल ॥50॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -