Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 48

90 Mantra
20/48
Devata- इन्द्रो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ न॒ऽइन्द्रो॑ दू॒रादा न॑ऽआ॒साद॑भिष्टि॒कृदव॑से यासदु॒ग्रः। ओजि॑ष्ठेभिर्नृ॒पति॒र्वज्र॑बाहुः स॒ङ्गे स॒मत्सु॑ तु॒र्वणिः॑ पृत॒न्यून्॥४८॥

आ। नः॒। इन्द्रः॑। दू॒रात्। आ। नः॒। आ॒सात्। अ॒भि॒ष्टि॒कृदित्य॑भिष्टि॒ऽकृत्। अव॑से। या॒स॒त्। उ॒ग्रः। ओजि॑ष्ठेभिः। नृ॒पति॒रिति॑ नृ॒ऽपतिः॑। वज्र॑बाहु॒रिति॒ वज्र॑ऽबाहुः। स॒ङ्ग इति॑ स॒म्ऽगे। स॒मत्स्विति॑ स॒मत्ऽसु॑। तु॒र्वणिः॑। पृ॒त॒न्यून् ॥४८ ॥

Mantra without Swara
आ नऽइन्द्रो दूरादा न आसादभिष्टिकृदवसे यासदुग्रः । ओजिष्ठेभिर्नृपतिर्वज्रबाहुः सङ्गे समत्सु तुर्वणिः पृतन्यून् ॥

आ। नः। इन्द्रः। दूरात्। आ। नः। आसात्। अभिष्टिकृदित्यभिष्टिऽकृत्। अवसे। यासत्। उग्रः। ओजिष्ठेभिः। नृपतिरिति नृऽपतिः। वज्रबाहुरिति वज्रऽबाहुः। सङ्ग इति सम्ऽगे। समत्स्विति समत्ऽसु। तुर्वणिः। पृतन्यून्॥४८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती) आमचा सेनापती (अभिष्टिकृत्‌) सर्वप्रकारे आम्हाला अभीष्ट सुख देणारा असून तो (वज्रबाहुः) वज्राप्रमाणे दृढ भुजा असणारा आहे. तो (नृपतिः) आम्हा लोकांचा रक्षक-पालक असून (ओजिष्ठेभिः) अति बलशाली सैनिकांसह (उग्रः) दुष्टांवर क्रोध करणारा आणि (तुर्वणिः) शत्रूंचा त्वरित नाश करणारा (इन्द्र) आमचा सेनापती शत्रुविदारक आहे. तो (नः) आमच्या (अवसे) रक्षणासाठी (समत्सु) घोर युद्धादी प्रसंगी (सङ्गे) व इतर काळी (दूरात्‌) दूर (असला तरी) धावून येवो (आसात्‌) अथवा जवळ असला तरीही (आ, यावत्‌) धावून येवो. आणि (नः) आमचे जे सैनिक संग्रामासाठी तत्पर आहेत, त्यांची व (आ) आमचीही योग्य वेळी रक्षा करो. तो सदा आमच्यासाठी माननीय असो. ॥48॥
Essence
भावार्थ - तेच लोक (वा राजा) राज्य करण्यात समर्थ होतात की जे दुरवरच्या अथवा जवळच्या सर्व प्रजाजनांवर (त्यांच्या रक्षणासाठी) लक्ष देतात. दूर पाठवून त्यांद्वारे माहिती मिळवतात आणि आपल्या शूर सैनिकांचा सम्मान-सत्कारही करतात ॥48॥
Subject
पुनश्च, तोच विषय -