Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 46

90 Mantra
20/46
Devata- स्वाहाकृतयो देवताः Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स्तो॒काना॒मिन्दुं॒ प्रति॒ शूर॒ऽइन्द्रो॑ वृषा॒यमा॑णो वृष॒भस्तु॑रा॒षाट्। घृ॒त॒प्रुषा॒ मन॑सा॒ मोद॑मानाः॒ स्वाहा॑ दे॒वाऽअ॒मृता॑ मादयन्ताम्॥४६॥

स्तो॒काना॑म्। इन्दु॑म्। प्रति॑। शूरः॑। इन्द्रः॑। वृ॒षा॒यमा॑णः। वृष॒यमा॑ण॒ इति॑ वृष॒यऽमा॑णः। वृ॒ष॒भः। तु॒रा॒षाट्। घृ॒त॒प्रुषेति॑ घृत॒ऽप्रुषा॑। मन॑सा। मोद॑मानाः। स्वाहा॑। दे॒वाः। अ॒मृताः॑। मा॒द॒य॒न्ता॒म् ॥४६ ॥

Mantra without Swara
स्तोकानामिन्दुम्प्रति शूरऽइन्द्रो वृषायमाणो वृषभस्तुराषाट् । घृतप्रुषा मनसा मोदमानाः स्वाहा देवाऽअमृता मादयन्ताम् ॥

स्तोकानाम्। इन्दुम्। प्रति। शूरः। इन्द्रः। वृषायमाणः। वृषयमाण इति वृषयऽमाणः। वृषभः। तुराषाट्। घृतप्रुषेति घृतऽप्रुषा। मनसा। मोदमानाः। स्वाहा। देवाः। अमृताः। मादयन्ताम्॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे (वृषायमाणः) बलिष्ठ असलेला (वृषभः) उत्तम (स्वभावाचा) आणि (तुराषाट्) हिंसक शत्रूंना ठार मारणारा कोणी (शूरः) शूरवीर मनुष्य (स्तोकानाम्‌) अल्पशक्ती असलेल्या निर्बळ (इन्दुम्‌) कोमल स्वभावाच्या माणसाला (प्रति) पाहून आनंदित होतो (कारण तो बलवान मनुष्य निर्बळांचे रक्षण करणारा असतो. आता मी आलो असल्यामुळे या दीनाला घाबरण्याची गरज नाही, असा विचार करतो) तसेच ज्याप्रमाणे (घृतप्रुषा) प्रकाश वा कीर्तीची इच्छा करणारे लोक आपल्या (मनसा) विज्ञानाद्वारे आणि (स्वाहा) व्यावहारिक ज्ञानाद्वारे (मोदमानाः) आनंदित होतात आणि ते (देवाः) विद्वान लोक (अमृताः) आत्मस्वरूपास ओळखून (मी अमर आहे, हे जाणून) (मादयन्ताम्‌) स्वतः तृप्त होतात, तसे त्यांनी इतर लोकांनादेखील (आत्म्याचे अमरत्व जाणून देऊन) तृप्त केले पाहिजे. ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जी माणसें अल्पगुणी व्यक्तीला पाहून त्याच्याविषयी प्रेमळ होतात, ते स्वतः सुखी होऊन सर्वांना सुखी करतात. ॥46॥
Subject
पुनश्च, तोच विषय -