Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 34

90 Mantra
20/34
Devata- लिङ्गोक्ता देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
प्रा॒ण॒पा मे॑ऽअपान॒पाश्च॑क्षु॒ष्पाः श्रो॑त्र॒पाश्च॑ मे। वा॒चो मे॑ वि॒श्वभे॑षजो॒ मन॑सोऽसि वि॒लाय॑कः॥३४॥

प्रा॒ण॒पा इति॑ प्राण॒ऽपाः। मे॒। अ॒पा॒न॒पा इत्य॑पान॒ऽपाः। च॒क्षु॒ष्पाः। च॒क्षुः॒पा इति॑ चक्षुः॒ऽपाः। श्रो॒त्र॒पा इति॑ श्रोत्र॒ऽपाः। च॒। मे॒। वा॒चः। मे॒। वि॒श्वभे॑षज॒ इति॑ वि॒श्वऽभे॑षजः। मन॑सः। अ॒सि॒। वि॒लाय॑क॒ इति॑ वि॒ऽलाय॑कः ॥३४ ॥

Mantra without Swara
प्राणपा मेऽअपानपाश्चक्षुष्पाः श्रोत्रपाश्च मे । वाचो मे विश्वभेषजो मनसो सि विलायकः ॥

प्राणपा इति प्राणऽपाः। मे। अपानपा इत्यपानऽपाः। चक्षुष्पाः। चक्षुःपा इति चक्षुःऽपाः। श्रोत्रपा इति श्रोत्रऽपाः। च। मे। वाचः। मे। विश्वभेषज इति विश्वऽभेषजः। मनसः। असि। विलायक इति विऽलायकः॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (शिष्ट म्हणतो) हे विद्वान अध्यापक महोदय, आपण (मे) माझ्या (प्राणपाः) प्राणांचे रक्षक आहात. आपणच माझ्या (अपानपाः) अपानाचे रक्षक असून (मे) माझ्या (चक्षुष्पाः) नेत्रांचे रक्षक (आहात) आपणच माझ्या (श्रोत्रपाः) कानांचे रक्षक (च) आणि (मे) माझ्या (वाचः) वाणीचे रक्षक आहात. (माझ्या प्राण, अपान, नेत्र, कर्ण , जिह्वा सर्व अवयवांवर नियंत्रण करण्याची विद्या, योगविद्या शिकविणारे आपण आहात.) आपण (विश्वभेषजः) माझ्यासाठी संपूर्ण औषधी (रोगापासून मला मुक्त करणारे वा दूर ठेवणारे) आहात. आपणच (मनसः) विज्ञानप्राप्तीचे जे साधन, त्या माझ्या मनाशी (विलायकः) विविधप्रकारे संबंध ठेवणारे (माझ्या मनावर नियंत्रण करणारे) (असि) आहात. त्यामुळे आपण मला वडिलांप्रमाणे पूजनीय वा सत्कार करण्यास योग्य आहात. ॥34॥
Essence
भावार्थ - मनुष्यासाठी हे उचित कर्म आहे की जे (अध्यापक, उपदेशक) बाल्यावस्थापासून आपल्याला विद्या, सुशिक्षा देत जितेंद्रिय करतात, सत्पुरूषांविषयी आपल्या मनात प्रेम उत्पन्न करतात, धर्म, विद्या आणि परोपकार यांकडे आपली प्रवृत्ती निर्माण करतात, ते अध्यापक आईप्रमाणे आणि मित्रा प्रमाणे आहेत, असे जाणावे ॥34॥
Subject
पुनश्च तोच विषय -