Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 32

90 Mantra
20/32
Devata- परमात्मा देवता Rishi- कौण्डिन्य ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
यो भू॒ताना॒मधि॑पति॒र्यस्मिँ॑ल्लो॒काऽअधि॑ श्रि॒ताः। यऽईशे॑ मह॒तो म॒हाँस्तेन॑ गृह्णामि॒ त्वाम॒हं मयि॑ गृह्णामि॒ त्वाम॒हम्॥३२॥

यः। भू॒ताना॑म्। अधि॑पति॒रित्यधि॑ऽपतिः। यस्मि॑न्। लो॒काः। अधि॑। श्रि॒ताः। यः। ईशे॑। म॒ह॒तः। म॒हान्। तेन॑। गृ॒ह्णा॒मि॒। त्वाम्। अ॒हम्। मयि॑। गृ॒ह्णा॒मि॒। त्वाम्। अ॒हम् ॥३२ ॥

Mantra without Swara
यो भूतानामधिपतिर्यस्मिँलोकाऽअधिश्रिताः । यऽईशे महतो महाँस्तेन गृह्णामि त्वामहम्मयि गृह्णामि त्वामहम् ॥

यः। भूतानाम्। अधिपतिरित्यधिऽपतिः। यस्मिन्। लोकाः। अधि। श्रिताः। यः। ईशे। महतः। महान्। तेन। गृह्णामि। त्वाम्। अहम्। मयि। गृह्णामि। त्वाम्। अहम्॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सर्वांचे हित चिंतणाऱ्या माणसा, (तू स्वार्थी नसून सर्वांचे कल्याणाचा विचार करतोस, म्हणून तुला मी आध्यात्मिक रहस्य सांगतो, ते ऐक) (यः) जो परमेश्वर (भूतानाम्‌) पृथ्वी आदी तत्त्वांचा आणि त्यापासून उत्पन्न कार्यरूप लोकांचा वा (पदार्थांचा) (अधिपतिः) स्वामी वा अधिष्ठाता आहे, जो (महतः) महान आकाशादी पदार्थांपासून (महान्‌) महान आहे आणि (यः) जो (ईशे) सर्वांचा ईश्वर आहे, आणि (यस्मिन्‌) ज्या ईश्वरात सर्व (लोकाः) लोक (अधिश्रिताः) अधिष्ठित वा आश्रित आहे, (तेन) त्या परमेश्वराशी (अहम्‌) मी (तुझा उपदेशक विद्वान) (त्वाम्‌) तुला (गृह्णामि) ग्रहण करतो संयुक्त करतो त्याची उपासना करण्याची पद्धती सांगतो आणि (हे करऱ्यासाठी आधी) (अहम्‌) मी (त्वाम्‌) तुला (मयि) माझ्यात (माझ्या हृदयात) (गृह्णामि) ग्रहण करतो - (तुझे हृदय माझ्याशी एकात्म करतो) (गुरूने प्रथम शिष्याला आपले मानावे, त्याच्या हृदयावर अधिकार करावा व नंतर त्यात ईश्वरउपासनेची स्थापना करावी) ॥32॥
Essence
भावार्थ - जो उपासक त्या अनंत ब्रह्मामधेच निष्ठा ठेवतो आणि त्याव्यतिरिक्त कोणालाही उपास्य मानत नाही, तोच या जगात विद्वान म्हणून मान मिळवितो. ॥32॥
Subject
आता विद्वानांसाठी त्यांच्या विषयी -