Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 29

90 Mantra
20/29
Devata- इन्द्रो देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
धा॒नाव॑न्तं कर॒म्भिण॑मपू॒पव॑न्तमु॒क्थिन॑म्। इन्द्र॑ प्रा॒तर्जु॑षस्व नः॥२९॥

धा॒नाव॑न्त॒मिति॑ धा॒नाऽव॑न्तम्। क॒र॒म्भिण॑म्। अ॒पू॒पव॑न्त॒मित्य॑पू॒पऽव॑न्तम्। उ॒क्थिन॑म्। इन्द्र॑। प्रा॒तः। जु॒ष॒स्व॒। नः॒ ॥२९ ॥

Mantra without Swara
धानावन्तङ्करम्भिणमपूपवन्तमुक्थिनम् । इन्द्र प्रातर्जुषस्व नः ॥

धानावन्तमिति धानाऽवन्तम्। करम्भिणम्। अपूपवन्तमित्यपूपऽवन्तम्। उक्थिनम्। इन्द्र। प्रातः। जुषस्व। नः॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सुखेच्घु आणि विद्यारूप ऐवर्याने युक्त मनुष्या, तुम्ही (नः) आम्ही (धानावन्तम्‌) चांगल्याप्रकारे स्वच्छ धान्यकणांपातून (करम्भिणम्‌) चांगल्या पद्धतीने बनविलेल्या (अपूपवन्तम्‌) उत्तम सुंदर रूपात तयार केलेल्या मालपुआ आदी पदार्थांचे (सेवन करीत जा) तसेच (उक्‌थिनम्‌) उत्तम वाणी वा शैलीने सांगितलेल्या उपकारक ज्ञान (ग्रहण करीत जा) आणि उत्तम भोजन-पदार्थांचे अन्न आदी रसांचे (प्रातः) सकाळी (जुषस्व) सेवन करीत जा (म्हणजे तुम्हाला आनंद तमळेल व विद्यारूप संपत्ती मिळविण्यास पात्र व्हाल. ॥29॥
Essence
भावार्थ - जे विद्वान लोकांना उत्तम विद्या आणि सदुपदेश देऊन शोभिवंत करतात आणि अशाप्रकारे विश्वाचे कल्याण करतात, तसेच (हे श्रेष्ठ कार्य करीत असता) उत्तम सुसंस्कारित अन्न, रस आदींचे उचित वेळी सेवन करतात. (योग्यवेळी जेवण करतात) (ते धन्यवादास पात्र ठरतात) शिवाय जे लोक त्या विद्वानांना अधिक विद्या व संस्कार प्राप्तीसाठी व्यवस्था करतात, उत्तम वाणीचा प्रयोग करतात, ते देखील धन्य आहेत. ॥29॥
Subject
पुन्हा तोच विषय -